राजुरीत ६५ दात्यांनी केले रक्तदान ; महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
करमाळा समाचार
राजेश्वर हॉस्पिटलच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त दिपावलीच्या पाडव्याची दिवशी राजुरीत रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी ६५ जणांनी रक्तदान केले. उमेद महिला बचत गटाच्या महिलांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन केले. रक्तदान करण्यात महिलांचा सहभाग उस्फुर्त असा होता. राजेश्वर हॉस्पिटल गेले दहा वर्षे सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून अविरतपणे वैद्यकीय सेवा करीत आहे.

कोरोनाच्या साथींमध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबीर घेण्याचे ठरवले आणि राजुरीतील ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग घेतला. गावांतील कुणालाही रक्ताची गरज भासल्यास आम्हाला संपर्क करा आपल्याला रक्त पोहोच करण्याची जबाबदारी आमची असेल. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो अजून तरी जगात रक्त तयार करणारी मशीन निर्माण झाली नाही म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं.
रक्तदान याविषयी राजेश्वर हॉस्पिटल चे प्रमुख सरपंच डॉ. अमोल दुरंदे व सौ. डॉ. विद्या दुरंदे यांनी मार्गदर्शन केले. संजय जाधव, संतोष गदादे, रियाज शेख, महेश जाधव यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. भगवंत ब्लड बँक, बार्शी यांनी रक्तदात्यांना प्रशस्तिपत्रक वाटप केले.
