जगताप गटाचे कट्टर समर्थक सतीश चोपडे यांचे निधन
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून वेगवेगळ्या दिवशी धक्कादायक दुर्दैवी अशा घटना घडत आहे. त्यामध्येच आता माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे कट्टर समर्थक वांगी क्रमांक तीन येथील सतीश चोपडे यांचे बुधवारी पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

स्व. सतीश चोपडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

चोपडे हे राजकारणात कोणत्याही पदावर नसले तरी जगताप गटाचे कट्टर समर्थक म्हणून ते जगताप यांच्या घरातील सदस्य असल्याप्रमाणे कार्य करताना दिसत होते. तहसील तसेच कचेरी परिसरातील विविध कार्यालयात अनेकांची अडकून पडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न चोपडे हे करीत होते. त्यामुळे राजकारण विरहित कार्य चोपडे यांचे दिसून येत होते. मनमोकळे प्रत्येकाशी आपुलकीचे नाते जपणारे चोपडे हे पहाटे दवाखान्यात उपचार घेत असताना सर्वांना सोडून गेले.