करमाळासोलापूर जिल्हा

आता फक्त तानाजी जाधव नव्हे तर डॉ. तानाजी जाधव म्हणावे लागेल ; मुळ गावी झाला सन्मान

करमाळा प्रतिनिधी सुनील भोसले


करमाळा येथे पत्रकार संघाच्या वतीने तानाजी जाधव यांना जगातील नामांकित असा नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार मिळाल्याने पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम जाधव म्हणाले मला मिळालेली डॉक्टरेट पदवी मी माझ्या तमाम टायगर ग्रुप च्या कार्यकर्त्यांना समर्पित करत असून या मिळालेल्या पुरस्कारामुळे इथून पुढील काळात जास्त वेगाने समाजसेवेचे काम करू असा विश्वास टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांनी व्यक्त केला.

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कट्ट्यावर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे, मनसेचे शहर प्रमुख नानासाहेब मोरे आदी उपस्थित होते. पत्रकार संघाच्या वतीने संघाचे सचिव नासीर कबीर, खजिनदार दिनेश मडके, सहसचिव प्राध्यापक अशोक नरसाळे, पत्रकार जयंत दळवी, नागेश चेंडगे, सुनील सूर्यपुजारी, संजय मस्कर, अण्णा काळे , विशाल घोलप, किशोर शिंदे, शेखर स्वामी, राजाराम माने, सचिन हिरडे, डीजे पाखरे, सचिन जव्हेरी, दैनिक एकमतचे गायकवाड, शंभूराजे फरतडे आदी पत्रकार उपस्थित होते. पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर तानाजी जाधव यांचा सत्कार करण्यात आला

पुढे बोलताना डॉक्टर तानाजी जाधव म्हणाले की, टायगर ग्रुप चे काम संपूर्ण देशात सुरू आहे. कोरणाच्या काळात दीड हजार मयत रुग्णांवर टायगर ग्रुप च्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी टायगर ग्रुप ने मोठे काम केले. शिवाय परदेशात अडकलेले लाखो भारतीय नोकरदारांना आपल्या माय देशात आणण्यासाठी टायगर ग्रुप मोठे नियोजन केले. जवळपास एक कोटी मास्क वाटले. जवळपास एका वेळी तीनशे ठिकाणी रक्तदान करून 20000 रक्तपिशव्या उपलब्ध करून दिल्या. या सर्व कामाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचा शांतता पुरस्कार मला मिळाला आहे.

त्याचबरोबर मला सोशल वर्कर म्हणजेच सामाजिक काम आत्मिक दिलेले योगदान याची दखल घेऊन अमेरिकन युनिव्हर्सिटी मार्फत मला डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे. या सर्व पुरस्काराला मी पात्र होण्यासाठी टायगर ग्रुपच्या तमाम देशातील कार्यकर्त्यांनी स्वार्थ बाजूला ठेवून प्रामाणिकपणे समाजसेवेची बांधिलकी ठेवली याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. आज मला डॉक्टरेट व 120 देशातील शांततेचा नेल्सन मंडेला पुरस्कार मला मिळाला. टायगर ग्रुपचे भाग्य आहे इथून पुढे अजून जास्त वेगाने समाजसेवेचे काम करणार असून करमाळा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेने या समाज सेवेचा चळवळीत सहभागी व्हावे असे आव्हान केले.

यावेळी पत्रकार नासीर कबीर यांनी आपल्या प्रास्तावीक मध्ये बोलताना आता कोठे गेले करमाळा नाव सांगितले की तुम्ही तानाजी भाऊ जाधव यांच्या गावचे का असा प्रश्न विचारला जातो हीच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून अशाच पद्धतीने तानाजी जाधव यांनी यापुढे जनतेची सेवा करावी अशी भावना व्यक्त केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE