करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा येथे महिला दिनाच्या निमित्ताने महिला तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन…..

करमाळा सुनील भोसले


राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटन फौंडेशन अंतर्गत महिला समुपदेशन व महिला तक्रार निवारण केंद्राचे करमाळ्यात महिला दिनानिमित्त उद्घाघाटन. महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिलांना मनमोकळं करायला एक हक्काचे व्यासपीठ असावं पीडित महिलेच्या पाठीमागं कोणीतरी उभं असावं म्हणून राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटन फाउंडेशन च्या सदस्या व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना च्या जिल्हा अध्यक्षा अंजली श्रीवास्तव यांनी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.यापूर्वी ही ओम महिला मंडळ अंतर्गत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला होता.

आज आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करमाळा येथे तक्रार निवारण केंद्राचे उद्घाघाटन अनिता ढाळे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी बोलताना म्हणाले. समुपदेशन केंद्राचा लाभ झाला.आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन येण्यासाठी मला समुपदेशन चा खूप फायदा झाला. पीडित महिलांनी अन्याय अत्याचार कौंटुबिक छळ सहन न करता न्याय व हक्कासाठी पुढे यावे. असे उदगार उदघाटन प्रसंगी अनिता ढाळे यांनी काढले.

मानवाधिकार च्या तालुका अध्यक्ष-ज्योती पांढरे यांनी ही महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी या केंद्राचा निश्चित फायदा होईल असे मत व्यक्त केले. महिलांना अधिकार व न्यायासाठी अशा व्यासपीठाची खूप गरज होती. मानवाधिकार च्या तालुका सचिव मा जयश्री वीर यांनी प्रास्ताविक केले.

शेवटी महिला सुरक्षाच्या रेशमा जाधव यांनी आभार मानले.
पत्रकार अलीम शेख व ह्युमन राईटशचे आयुब शेख यांनी ही सर्व महिलांचा महिला दिनानिमित्त सत्कार करून कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी गझलकारा आर्किटेक्ट मितवा श्रीवास्तव, सोनाली देवी, रोहिणी गेंड यांची ही उपस्थिती होती.
मा.विशालजी हिरे (जिल्हा पोलीस उपअधीक्षक करमाळा.) यांनी ही महिला समुपदेशन व तक्रार निवारण केंद्राच्या उदघाटनास हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असून या केंद्राचा पीडित महिलांना निश्चित न्याय व हक्कासाठी फायदा होईल .व बर्याच अडचणी दूर होतील असा विश्वास दाखवला आणी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE