बऱ्याच वेळा तक्रारी कारवाई मात्र शुन्य ! ; रस्त्याच्या कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
करमाळा समाचार

आवटी ते कोर्टी रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले काम आता वेगात सुरू असले तरी कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन यात होताना दिसत नाही. रस्त्याच्या कामात घाईगडबडीत मुरमा मध्ये मोठी दगडे तर पावसाळ्यात सुरू असलेल्या कामांमध्ये काम पूर्ण होण्यापूर्वीच खड्डे पडण्याचा धोका शिवाय पूर्ण रस्ता न करता रस्त्यांवर काम केले जात असल्याच्या तक्रारी सुरू आहेत.

आज पर्यंत बऱ्याचदा या रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी आल्या तरीही संबंधित ठेकेदार ला कसलेही प्रकारची सूचना किंवा कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. सदरच्या कामात अधिकारी या ठेकेदाराला का पाठीशी घालतात हा मुळात मोठा प्रश्न आहे. संबंधित ठिकाणी झालेल्या तक्रारीची दखल घेणे गरजेचे असतानाही तक्रारीची दखल न घेता “हम करे सो कायदा” या पद्धतीने काम सुरू असल्याने लोकांनीही आता याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.
यासंदर्भात वारंवार तक्रार केली तरी संबंधित ठेकेदाराला समज दिली जात नाही. शिवाय पावसातही काम सुरू राहते. तर देवीच्या माळ परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुक असते. बाह्यवळण रस्त्यामुळे मोठी वाहने वाहतुक करतात त्यात नव्या कामाचे खड्डे व भराव झाल्यानंतरही पावसात काम सुरू यामुळे गाड्या अडकण्याचे प्रमाण व येणाऱ्या काळात खड्डे पडण्याचा धोका आहे. संबंधित ठेकेदाराने पाच वर्षे सदर रस्त्यावर लक्ष ठेवण्याची जरी ठरले असली तरी या कामामुळे कमी वेळेतच रस्ता पुन्हा एकदा करावा लागेल अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
