करमाळ्यात पोलिसांनी अचानक कारवाई शॉपच्या मालकासह 22 व्यक्तींवर कारवाई
करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस खात्याने विना मास्क असणाऱ्या वर व कोरोनाच पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांना व दुकानदाराना चांगलाच धडा शिकवला या कारवाईमुळे शहरात रात्रीच्या वेळेस चालणारे मद्य विक्री करणारे व भटकत फिरणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईची सुरूवात, दिनांक 12 मार्च रोजी रात्री 08.00 वाजण्याच्या सुमारास करमाळा येथील एका दुकानापासुन सुरु झाली. विशाल हिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, करमाळा यांच्यासोबत श्रीकांत पाडुळे, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने व पोलीस पोलीस कॉन्स्टेबल सूरज तनपुरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पायघन, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिंदे चालक पोलीस कॉन्स्टेबल विलास ओमासे यांनी अचानक रेड करता दुकानदार विना मास्क सर्विस देताना मिळून आल्याने त्यांच्यावर तसेच सुमारे अर्ध्या तासात विना मास्क आलेल्या 21 गिऱ्हाईकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत दुकानदार वतीने चालकावला 1000/- रुपये दंड व विना मास्क गिर्हाईकाला प्रत्येकी 500/- रुपये दंड करण्यात आला. या कारवाईमुळे करमाळा शहरात अचानक खळबळ उडाल्याने इतर दुकानदार व व्यवसायिकांनी आपापली दुकाने ताबडतोब बंद केली. करमाळा शहरांमध्ये पोलीस खात्यातर्फे आजपासून कडक कारवाईला सुरुवात केली असून यापुढे जास्तीत जास्त केसेस करण्याची तजवीज ठेवली आहे. या कारवाईत खालील २२ जणांना दंड करण्यात आला.