करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मंत्र्याच्या बनावट सहीने कारखान्याला पंचवीस लाखांचा गंडा ; दोघांवर गुन्हा दाखल

करमाळा – विशाल घोलप

येथील कमलाई साखर कारखान्याला निर्यातीचा परवाना मंजूर करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून निर्यात परवान्यावर खोट्या सह्या करून बनावट आदेश तयार केले. तसेच यासाठी कारखान्याकडून २५ लाख रुपये घेऊन कारखान्याची दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार ९ जानेवारी २०२४ ते ६ मार्च २०२४ दरम्यान घडला आहे. गुन्हा ९ मार्च रोजी दाखल करण्यात आला.

मिंडा व्ही. श्रीनिवास राव रा. दिली व व्ही आर मुर्ती रा. (पत्ता माहीत नाही) असे दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कारखान्याचे मुख्य वित्त अधिकारी आनंदराव उबाळे रा. करमाळा यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, कारखान्याच्या साखरेला परदेशात मागणी असल्याने निर्यातदारा मार्फत साखर निर्यात न करता कारखान्याने स्वतः आयात निर्यात करण्यासाठी नोंदणी करून आयात निर्यात परवाना घेतलेला आहे. चालू गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने खुली साखर निर्यात करण्यास बंदी घातलेली आहे. परंतु विशेष बाब म्हणून इतर देशांची साखरेची मागणी आल्यानंतर (डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड) विदेशी व्यापार महा संचनालय त्यांच्या मंजुरीने साखर निर्यात करता येते. त्या अनुषंगाने कारखान्यास लेबनॉन, श्रीलंका, दुबई या देशातून साखरेची मागणी आलेली होती.

परंतु सदर प्रक्रिया फार किचकट व गुंतागुंतीची असल्याने सदरचा आदेश प्राप्त करून घेण्यासाठी तामिळनाडू येथील साखर घेणाऱ्या कंपनीचे मॅनेजर श्री वेटरीवेथन यांना संपर्क साधला असता त्यांनी मिंडा यांची ओळख करून दिली. त्यानंतर मिंडा यांनी नवी दिल्ली येथील व्ही.आर. मूर्ती यांना आदेश देण्यासंबंधीचा अनुभव असल्याचे सांगून भेट घालून दिली. या संदर्भात कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमसिंह शिंदे यांनी संबंधित व्यक्तीची भेट घेतली. त्याने आदेश काढून देतो म्हणून सांगितले. त्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली.

दरम्यानच्या काळात शिंदे यांनी संबंधितावर विश्वास ठेवला व त्यांच्याकडून आदेश प्राप्त करण्याचे ठरले. त्यानंतर व्ही. आर. मूर्ती यांनी नवी दिल्ली येथे शिंदे यांना समक्ष बोलवून तुमचा परवाना मिळाला असल्याचे सांगितले. त्यावेळी २३ फेब्रुवारी रोजी रेल वाणिज्य व उद्योग तथा उपभोक्ता मामले खाद्य आणि साार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांचे लेटरहेडवर डी.जी.एफ.टी. कार्यालयाकडे साखर निर्यात करण्यास मंजुरी बाबत शिफारस पत्र पियुष गोयल यांच्या सहीने असलेले दिले व त्यासाठी रक्कम ही आरटीजीएस करण्यास सांगितले.

यानंतर सदरची कागदपत्रे ऑनलाइन तपासली असता सही व मायना जुळली नाही. यामुळे संबंधित कार्यालयात जाऊन पाहणी केली असता सदरचे कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. यावरून संबंधित प्रकरणात कारखान्याला फसवल्याचे दिसून आले. त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE