९ हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले ; लाचलुचपत विभागाची कारवाई
विशेष प्रतिनिधी – करमाळा समाचार
रजिस्टर वाटणीपत्राचे फेरफार रजिस्टरला नोंद करण्यासाठी 10,000/- रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडी अंती 9,000/-रुपये लाचेची रक्कम घोटी ते वरकुटे गावाकडे जाणारे रस्त्यावरील भवानी मातेच्या मंदिराजवळ स्वत: स्विकारून तलाठी अनभुले यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. ता. माढा, जि. सोलापूर असे तलाठ्याचे नाव आहे. तुकाराम राजाराम अनभुले, तलाठी, सजा- घोटी/मलवडी, ता.करमाळा असे सापळ्यात अडकलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

दि ८ रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सदरच्या फेर नोंदीसाठी तलाठी अनभुले यांनी दहा हजाराची मागणी केल्यावर सदर घटनेबाबत राऊत यांनी सोलापूर येथील लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केल्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचुन अनभुले यांना ताब्यात घेतले आहे.

तरी अनभुले यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून त्यांना कायद्याने मिळावयाचे त्या खेरीज फिर्यादीचा चुलत भाऊ राऊत यांचे रजिस्टर वाटणीपत्राचे फेरफार रजिस्टरला नोंद करण्यासाठी 10,000/- रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडी अंती 9,000/-रुपये लाचेची रक्कम घोटी ते वरकुटे गावाकडे जाणारे रस्त्यावरील भवानी मातेच्या मंदिराजवळ स्वत: स्विकारून तलाठी अनभुले यांनी वैयक्तीक सांपत्तीक फायदा मिळवून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले आहे.
म्हणुन तुकाराम राजाराम अनभुले, तलाठी, सजा- घोटी/मलवडी, ता.करमाळा, जि. सोलापूर रा. मु.पो. उपळाई (खुर्द), ता. माढा, जि. सोलापूर यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये कारवाई होण्याकरिता फिर्याद आहे.