करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यातील डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे पुरस्कार जाहीर

करमाळा समाचार 


येथील डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक व कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

याबाबत संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित कणसे यांनी माहिती दिली आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवारी (दि. १२) सकाळी अकरा वाजता यशकल्याणी सेवाभवन येथे होणार आहे.

यावेळी श्रीकमलादेवी कन्या विद्यालयाचे सहशिक्षक, साहित्यिक भीष्माचार्य चांदणे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे – पाटील, गट विकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, संघटनेचे प्रदेश सचिव सुनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कोरोना काळातील शैक्षणिक परिस्थिती व आपली जबाबदारी या विषयावर करे – पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून गेल्या आठ वर्षापासून संघटनेच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक हे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षक व शाळांची घोषणा करताना अजित कणसे, चंद्रकांत वीर, शहाजी रंदवे, नवनाथ मस्कर , संतोष शितोळे , प्रविण शिंदे ,पोपट पाटील, दत्तात्रय जाधव, अशोक कणसे, विजय बाबर, संतोष माने, सुधिर माने, महेश निकत, शरद पायघन, सुनिल पवार, अंकुश सुरवसे, विकास माळी, शरद झिंजाडे, मिलिंद डमरे, उमराव वीर, सोमनाथ पाटील, लहू चव्हाण, दादासाहेब माळी, वैशाली शेटे, सुनिता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनिता शितोळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे आहेत.
—–
कमल वाघ, अर्चना जगताप (अंगणवाडी क्रमांक ६१, पाडळी), रामहरी ढेरे (उंदरगाव), श्रीराम बुलबुले (बोरगाव), रामहरी गुटाळ (अंजनडोह), महेश आरडे (घरतवाडी), श्रीकृष्ण भिसे (वांगी एक), सुहास गुळवे (वांगी दोन), अनिता बारवकर (कोंढारचिंचोली), वनिता बडे (खडकेवाडी), दिप्ती जगताप (देशमानेवस्ती), राणी सातव (मलवडी), प्रज्ञा जोशी (नगरपरिषद मुली दोन), किशोरकुमार शिंदे (एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा, करमाळा), मन्नान मोमीन (हिसरे), बब्रुवाहन मोरे (सावडी), प्रा. संभाजी किर्दाक (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा).

पुरस्कारप्राप्त शाळा
—–
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी क्रमांक चार आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोमलवाडी.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE