करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील साखर कारखानादारांनी शेतकऱ्यांसाठी कोविड केअर सेंटर उभारावेत

करमाळा समाचार


करमाळा तालुक्यात सध्या कोरोना पेंशटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये ग्रामीण भाग हा करमाळा शहरापेक्षा जास्त बाधीत आहे. यात सर्व शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात आहे. तरी ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण साखर कारखानदारी चालवतो त्यांचे आज आरोग्य कोरोनाच्या साथीमुळे संकटात आहे. अशा शेतकऱ्यांसाठी कारखानदारांनी कोविड केअर सेंटर उभारण्यास सहकार्य करावे अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी केली आहे.

सध्या शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना उपचार मिळवण्यासाठी भटकावे लागत आहे. हाॅस्पिटल मध्ये कुठे ही बेड शिल्लक नाही. ना इंजेक्शन, ना लस शिल्लक आहे. तरी शेतकरी टिकला तरं आपण टिकणार आहे. त्यांच्या जीवावर लाखो रूपये कमवणाऱ्या कारखानदारांनी लवकरात लवकर ह्या मागणीचा विचार करून निर्णय घ्यावा.

तर या प्रकरण संजय घोलप यांच्या नेतृत्वाखाली मनसे तालुका व शहरच्या वतीने तहसीलदार साहेबांना या करता भेटुन निवेदन देऊन लवकर काॅव्हिड सेंटर उभा करावेत यासाठी साखर कारखानदारांना आदेश काढावेत अशी मागणी करणार आहे, अशी माहिती मा.नानासाहेब मोरे मनसे शहरअध्यक्ष यानी दिली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, ता. उपाध्यक्ष, अशोक गोफणे, ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल, शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि. म. न. वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म. न. वि. से. जि. अध्यक्ष सतिश फंड, जि. उपाध्यक्ष म. न. वि. से. मा. आनंद मोरे, शहर अध्यक्ष म. न. वि. से मा. तेजस राठोड , शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा. अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा. रोहित फुटाणे, शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य, शहर उपाध्यक्ष मा.सचिन कणसे, किरण कांबळे, सो. जि. म. न. वि. से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके, मा. अनिल माने, योगेश काळे, अमोल जांभळे, राजा कुभांर, विजय हजारे, योगेश काळे, स्वप्निल कवडे आदि उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE