करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा एस टी आगारासाठी तातडीने ३० नवीन बसेसची व्यवस्था करावी : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे

करमाळा समाचार

करमाळा एसटी आगारासाठी तातडीने ३० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगीतले कि, करमाळा एसटी आगाराकडे बसेसची संख्या कमी असून आहेत त्यादेखील नादुरूस्तीचे प्रमाण जास्त आहे. सुस्थितीतील एसटी बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

करमाळा आगाराला लांब व जवळच्या पल्ल्यासाठी एकूण ८५ बसेसची आवश्यकता असताना ६५ बसेस उपलब्ध आहेत त्यातील १० नादुरुस्त आहेत ,त्यामुळे गाड्या फेल होणे – रद्द होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत . त्यामुळे पासेस काढलेले शालेय विद्यार्थी , रुग्ण व प्रवाशांना प्रचंड गैरसाईला सामोरे जावे लागत आहे. शासनाने महिलांना व ज्येष्ठांना सवलतीच्या दरात प्रवास सुविधा दिल्या मुळे एसटी कडे प्रवाशांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे .

परंतु बसेसची संख्या व त्यातही सुस्थितीतील बसेसची संख्या अपुरी आहे . तरी यांवर ठोस उपाययोजना व अत्यावश्यक सेवेतील भाग असल्यामुळे शासनाने करमाळा बस आगारा साठी तातडीने ३० नवीन बसेस उपलब्ध कराव्यात अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे . “करमाळ्याचे दिवगत माजी आमदार नामदेवराव जगताप यांनी राज्य परिवहन महामंडळाचे सदस्य असताना करमाळा येथे भव्य बसस्थानक व वर्कशॉप ची उभारणी केली होती तसेच शेकडो तरुणांना एसटी महामंडळात रोजागाराची संधी दिली होती .कै . जगताप यांची महामंडळ सदस्यपदाची कारकिर्द अविस्मरणीय होती .त्यामुळे माजी आमदार जगताप यांच्या मागणीला विशेष महत्व आहे .”

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE