E-Paperक्राईम

बारामती पोलिसांची मोठी कारवाई विक्रीसाठी आणलेल्या तलवारीसह युवकाला घेतले ताब्यात

प्रतिनिधी – बारामती

बारामती तालुक्यातील मौजे बादलवाडी कॅनल जवळ बारामती पोलिसांनी शिताफीने पाठलागकरुन नितीन मल्हारी खोमणे वय 25 राहणार पिंपरी तालुका बारामती जिल्हा पुणे या युवकाला त्याच्याकडील मोटरसायकलसह तलवारी व एका पिस्टल सह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शेगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, पोलीस कॉन्स्टेबल अकबर शेख, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, अतुल जाधव, होमगार्ड साळुंखे यांनी केली आहे.

बारामती पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे व इतर साथीदारांसह मौजे बादल वाडी कॅनल जवळ सापळा रचून शिताफीने पाठलाग करून 25 वर्षीय युवकास पकडले. त्यावेळी त्याच्याकडे एक मोटरसायकल, 20 स्टील तलवारी व एक छरेची लोखंडी पिस्टल मिळुन आली आहे. भारत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) मुंबई पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE