करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

रस्त्यावरुन झालेल्या भावकीच्या वादा नंतर दोघांना अटक ; चार दिवसांची पोलिस कोठडी

करमाळा समाचार

रस्त्याच्या वहिवाटीवरून झालेल्या भावकीतील वाद मारहाणीत रूपांतर झाले आहे.त्यातून एक जण गंभीर जखमी तर पाच किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही गटाच्या बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी चार लोकांवर तर गजाने मारहाण केल्याप्रकरणी चार लोकांवर अशा आठ लोकांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन जण ताब्यात घेतले आहेत त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

ब्रह्मदेव काळे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना टेंभुर्णी येथे दवाखान्यात उपचारा कामी दाखल करण्यात आले आहे. त्यांना जीव मारणाच्या उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी मधुकर काळे, सुहास काळे, दत्तात्रय काळे व संदीप काळे रा. वडशिवणे या चौघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बळीराम काळे यांनी फिर्याद दिली आहे. तर दत्तात्रय काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ब्रम्हदेव काळे, बळीराम काळे, दिलीप काळे, भैरु काळे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडशिवणे ता. करमाळा येथे काळे कुटुंबीय हे राहतात. त्यांची वडशिवणे येथे गट नंबर ६७ तर त्यांचे चुलते मधुकर काळे यांची गट नंबर ६४/ एक अशी जमीन आहे. त्यामधून कॅनल ते कविटगाव तालुका करमाळा जाणारा कच्चा रस्ता फार व पूर्वीपासून आहे. त्या रस्त्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला आहे. तर त्या रस्त्यावरून जाऊ नये म्हणून सदरच्या दोन्ही गटात कायम वाद होता. त्यामुळ रस्ता खोदणे, रस्ता अडवणे असे प्रकार होत होते. यातूनच वाद वाढला व मारहाणीत रूपांतर झाले. दि १३ रोजी दुपारी चारच्या सुमारास वडशिवणे शिवारात दोन्ही गेट भिडले.

या मारहाणी मध्ये ब्रह्मदेव काळे यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर दोन्ही गटातील इतर पाच जखमी झाले आहेत. याप्रकरणात सुहास काळे (वय ३६) व दत्तात्रय काळे (वय ३४) यांना ताब्याअ घेतले आहे. त्या दोघांनाही चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE