करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

पोलिस असल्याचे सांगत तीन सोन्याच्या अंगठ्या लंपास ; दोघांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार

कंदर ता. करमाळा येथील वर्ष श्राद्धाचा कार्यक्रमाला जात असताना मांजरगाव ता. करमाळा येथील मोहन पाटील यांना अनोळखी दोन इसमांनी पोलिस असल्याचे सांगून त्यांच्याकडील तीन पिळ्याच्या अंगठ्या अंदाजे रक्कम ४५ हजार घेऊन पसार झाले आहेत. सदरची घटना १४ एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर पांगरी जवळ खराडे वस्ती येथे घडला आहे.

याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन बाबासाहेब पाटील (वय ५६) हे शेतकरी मांजरगाव येथे शेती करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. आपल्या ओळखीचे कंदर येथील सुनील माने यांच्या घरी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असल्याने सकाळी ते पत्नीसोबत मोटारसायकल (क्रमांक एम. एच. ४२ एम. ६०३१) या मोटरसायकलवर कंदर कडे जात होते.

अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावरील पांगरी जवळ खराडे वस्ती येथे आल्यानंतर मागील बाजूने मोटरसायकलवर दोन जण पाटील यांच्या समोर आले. त्यांनी पाटील यांना गाडी थांबवायला सांगितली. त्यांना कारण विचारले असता त्यांनी पोलिस असल्याचे सांगत या रस्त्यावर नेहमी चोर्‍या होत असतात तुम्ही अंगावरील दागिने काढून ठेवा असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर पाटील यांच्या कडील पंचा घेऊन त्यांच्या उजव्या हातातील तीन सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या अंदाजे रक्कम ४५ हजार रुपये काढून सोबत असलेल्या पंचा मध्ये गुंडाळुन ठेवल्या व पंचा पाटील यांच्याकडे दिला. काही वेळानंतर पंचा मध्ये ठेवलेल्या अंगठ्या व्यवस्थित आहेत का हे पाहण्यासाठी खात्री करायला गेल्यानंतर त्यामध्ये आमच्या दिसून आले नाही. त्यावेळी पोलिस असल्याचे सांगून त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर दोन अनोळखी व्यक्ती विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE