करमाळासोलापूर जिल्हा

कोविड केअर सेंटरसाठी व लसीकरणसाठी इमारत व बेड साठी दत्तकलाचा पुढाकार

प्रतीनिधी- प्रा. प्रविण अंबोधरे

देशामध्ये सर्वत्र कोरोनाने थैमान माजवले असल्याने सर्व ठिकाणी कोरोना केअर सेंटरची व बेडची कमतरता भासत असल्याने करमाळा तालुक्यामध्ये असलेल्या केत्तुर नं -1 या ठिकाणी संस्थेच्या इमारतीमध्ये 50 बेडचे कोविड केअर सेंटर व इतर कोविड केअर सेंटरसाठी बेड देण्याची तयारी दर्शवली आहे असे पत्र जिल्हाअधिकार्यांना पाठवले असल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी दिली.

यापुर्वी दत्तकला शिक्षण संस्थेने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यासाठी 150 बेड दिलेले आहेत त्यामधिल दौंड शहरासाठी 50 बेड व स्वामी चिंचोलीसाठी 100 बेड दिलेले आहेत, तसेच इंदापुर तालुक्यासाठी भिगवण या ठिकाणी 50 बेड दिलेले आहेत.

त्याचबरोबर दौंड, इंदापुर,करमाळा या ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्रे, व महसुल विभाग यांना मास्क,सॅनिटायझर, व ग्लोजचे वाटप केलेले आहे त्याचबरोबर मा.तहसीलदार करमाळा यांच्या प्रयत्नाने पहिल्या लाटेमध्ये करमाळा तालुक्यातील इतर राज्यातील मजुरांना त्यांच्या मुळ गावी विनामोबादला संस्थेच्या बसेस द्वारे पोहोचविण्यात आले,
तसेच 500 गरिब कुटुबांना मोफत किराणा वाटप केलेला आहे,
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये संपूर्ण देशामध्येच पोलीस, आरोग्य यंत्रणा व महसुल विभागावरती ताण येताना दिसत आहे त्यामुळे सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये नविन कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत मागणी होत असुन त्याच बरोबर काहि कोविड केअर सेंटरला बेडची आवश्यकता आहे असे दिसुन येते, म्हणुन आम्ही दत्तकला शिक्षण संस्थेमार्फत 50 बेड देण्यास तयार आहोत,त्याचबरोबर करमाळा तालुक्यामधील पश्चिम भागातील जनतेसाठी कोविड केअर सेंटरची आवश्यकता असल्याने संस्थेची केत्तुर या ठिकाणी असलेली 30,000 चौ.फुटाची इमारत विलगीकरणासाठी देण्यास तयार आहे अशी माहिती प्रा.झोळ सर यांनी दिली.

त्याचबरोबर संपुर्ण देशामध्ये 1 मे पासुन 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे, त्यावेळेस होणारी गर्दी टाळण्यासाठी या इमारतीचा व त्यासमोरील मैदानाचा उपयोग करता येउ शकतो म्हणुन याबाबत आपणाकडुन लवकरात लवकर संबंधित विभागांना सुचना करण्यात याव्यात जेणेकरून गरजुंना वेळेत मदत होईल व लसीकरणादरम्यान होणारी गर्दी टाळता येईल असे प्रा.झोळ यांनी जिल्हाअधिकार्यांना लिहलेल्या निवेदनात म्हटले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE