जिल्ह्याच्या नेते पदावरुन कार्यकर्त्यात जुंपली ; मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यावर विरोधकांचा पलटवार
करमाळा समाचार
पंढरपुर निवडणुकांनंतर निकाल हाती लागले त्यावेळी अनेकांनी मोहिते-पाटील यांचा त्यात सिंहाचा वाटा असल्याचे जाहीर केले. तर जिल्ह्याचे नेते म्हणून मोहिते पाटीलच असल्याचे बोलले गेले. पण निकालानंतर नुतन आमदार समाधान अवताडे यांच्या शुभेच्छांच्या जाहिरातीमधून मोहिते-पाटलांना जागा न मिळाल्याने त्यावरून आता टीका होताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रशांत परिचारक व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फोटोसह मोहिते पाटील यांचाही फोटो असणे अपेक्षित असताना त्यांचा फोटो का नाही ? यावरून सध्या मोहिते पाटील गटाला ट्रोल केले जात आहे.

संबंधित जाहिरात नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांच्याच कंपनीने दिल्याचा दावा केला जात आहे. तुम्ही जिल्ह्याचे नेते विजयाचे शिल्पकार तर शुभेच्छांच्या या जाहिरातीमध्ये तुम्ही का नाही असा प्रश्न विचारला जातो आहे. आवताडे यांच्या विजयात आपला सिंहाचा वाटा असल्याचा मोहिते गटाच्या कार्यकर्त्यांनी दावा केला होता. तर प्रसारमाध्यमांतही मोहिते गटाला मुख्य चर्चेत आणले होते.
शिवाय जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनीही मोहिते हेच जिल्ह्याचे नेते कसे आहे आहेत. हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण नवनिर्वाचित आमदारनेच जर स्वतःच्याच कंपनीच्या जाहिरातीतून मोहितेंना जागा दिली नसेल तर विजयात त्यांचा सहभाग किती टक्के आहे. असा प्रश्न पडु लागला आहे. यावरुन कार्यकर्त्यात वाद रंगला आहे.