करमाळासोलापूर जिल्हा

मे महिण्याच्या चार दिवसात कोरोनाने गाठला तीनशेचा आकडा तरीही मंगळवारी दिलासा

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात मे महिन्यातील चार दिवसांमध्ये एकूण तीनशे पाच रुग्ण आढळले आहेत. मागील महिन्यात शंभरचे पुढे रुग्ण संख्या वाढत चाललेले असताना मंगळवारी मात्र ही रुग्ण संख्या 51 वरती आल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे चार दिवसात 305 आकडा जरी दिसत असला तरी आजच्या रुग्ण संख्येवरून दिलासा मिळत आहे.

तालुक्यात सध्या सर्वच ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात असताना आजचा पॉझिटिव रुग्ण संख्येचा आकडा मात्र दिलासा देणारा आहे. लोकांनी अशीच नियमांचे पालन केले तर लवकरच रुग्ण संख्या आटोक्यात येऊन पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत होणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजन तुटवडा तर आहेच शिवाय रेमडीसिवर इंजेक्शन भेटत नाही. त्याशिवाय आता बेडही मिळणे मुश्किल झाले आहेत अशा परिस्थितीत आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून बाहेर वावर योग्य नाही. हे जीवावर बेतू शकते. त्यामुळे कोणी सांगण्यापेक्षा आपले आपण स्वतःचे विचार करून घरीच थांबणे व इतरांपासून अंतर राखून राहणे पसंत करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

मागील महिन्यात शंभरी कडे जाणारे आकडे आता एक तारखेपासून थोडसे बदलताना दिसत आहेत. पहिल्याच दिवशी एक तारखेला 82 रुग्ण आढळले होते. तर दोन तारखेला सुट्टी च्या दिवशी हीच रुग्णसंख्या 53 वरली दोन दिवसाचे बरेपैकी आकडे आल्यानंतर तिसर्‍याही दिवशी दिलासा मिळेल असे वाटत असताना हीच संख्या 119 वर गेल्याने पुन्हा एकदा चिंता वाढण्याचे दिसून आली. परंतु मंगळवारी पुन्हा एकदा हीच रुग्णसंख्या 51 वर आल्याने पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी काळजी घेतल्यास लवकरच करमाळा कोरोना मुक्त झालेला दिसून येईल. वाढत असलेली रुग्ण संख्या ही चिंतेची बाब आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE