केशव प्रतिष्ठान च्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न
करमाळा समाचार
कोरोना महामारी मध्ये रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी केशव प्रतिष्ठानच्या वतीने भा.ज.पा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्या प्रयत्नातून आणलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, आरोग्य अधिकारी डाॕ.अमोल डुकरे तालुकाआरोग्य आधिकारी डाॕ. सागर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालालजी देवी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, डॉक्टर असोशियन चे अध्यक्ष डॉ श्रीराम परदेशी, डॉ.राहुल कोळेकर,
डॉ अविनाश घोलप, डॉ. अमोल घाडगे, क.न.पा नगरसेवक महादेव फंड, मनसे तालुकाप्रमुख संजय घोलप, नगरसेवक सचिन घोलप, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिपक चव्हाण, सरपंच विनय ननवरे, केमिस्ट असोसिएशनचे सचिन साखरे, भाजपाचे सरचिटणीस नितीन आढाव, पत्रकार सुहास घोलप आशपाक सय्यद, पत्रकार विशाल घोलप व प्रतिष्ठित मान्यवर व केशव प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.