करमाळाबार्शीसोलापूर जिल्हा

मनोहर भोसले (मामा) यांना बार्शी न्यायालयाकडुन तात्पुरता दिलासा

करमाळा समाचार 

महिलेवर अत्याचार प्रकरणी अटकेत असलेले मनोहर भोसले यांना बार्शी सत्र न्यायालयाच्या वतीने एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने करमाळा न्यायालयानी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याला आव्हान देत बार्शी येथे फेरविचार करण्याबाबत मागणी करमाळा पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती. परंतु ती मागणी मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. यावेळी मनोहर भोसले यांच्या बाजूनी एडवोकेट रोहित गायकवाड यांनी काम पाहिले.

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी करमाळा येथे सुरवातीला सात व नंतर चार दिवसांच्या पोलिस कोठडी नंतर मनोहर भोसले यांना 1 ऑक्टोंबर रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी च्या दरम्यान मनोहर भोसले हे आजारी असल्याने सोलापूर येथे उपचारासाठी गेले होते. सुरूवातीचे केवळ चार दिवस तपासासाठी मिळाल्याचे कारण करत करमाळा पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी ची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने फक्त चार दिवस वाढवून दिले होते.

*अहमदनगर टेंभुर्णी महामार्गाची सध्या अशी अवस्था झाली आहे कि, त्या रस्त्यावर खड्डा पडला आहे म्हणणे म्हणजे दिशाभूल ठरत आहे !!* करमाळा टेंभुर्णी मार्गाची झालेली दुरावस्था कशा पद्धतीने झाली आहे. त्याला खड्डा म्हणाल की आणखी काही ?

त्यानंतर 1 ऑक्टोंबर रोजी जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी येथील न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली ही बाब पोलिसांना रुचलेली नाही. त्यामुळे तपासासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी बार्शी येथे सत्र न्यायालयात रिविजन दाखल केले. त्यावर मंगळवारी चर्चा झाली. पोलिसांच्या वतीने सरकारी वकील यांनी बाजू मांडताना अपुरा वेळ मिळाल्याचे सांगितले. तर वेळ वाढवून देणे कशा पद्धतीचे चुकीचे ठरू शकते करमाळा न्यायालयाने दिलेला आदेश हा योग्य असून त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी भोसले यांचे वकील गायकवाड यांनी केली.

त्यावर आदेश देताना न्यायाधीश श्री भस्मे यांनी सर्व बाबींचा विचार करून भोसले यांच्या विरोधात आलेली रिव्हिजन ची मागणी ऐकून मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भोसले हे न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत. तर मनोहर भोसले यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला असून 20 रोजी  सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती ॲड गायकवाड यांनी दिली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE