करमाळासोलापूर जिल्हा

रुग्णाच्या नातेवाईकांमुळे कोरोना वाढण्याचा धोका ; फवारणी करण्याची मागणी

करमाळा समाचार 

करमाळा शहरातील मेनरोड वरील शहा हाॅस्पिटल (जवळेकर) येथे सध्या कोरोना( covid-19) चे ट्रीटमेंट सुरू असलेले पेशंट अॅडमिट आहेत. पेशंट बरोबर आलेले त्यांचे नातेवाईक, मित्र वर्ग व इतर लोक असतात ते लोक इतरत्र सगळीकडे हाॅस्पिटल च्या बाहेर वट्यांवर गप्पा मारत बसलेले असतात अशा लोकांमुळे परिसरातील आजुबाजुच्या लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे नगरपालिके कडून आजुबाजुच्या परिसरात व पंजाब वस्ताद चौक ते सुभाष चौक दरम्यान सॅनिटायझर फवारणी करावी. वार्ड क्रमांक १४ मधील नागरिकांची मागणी.

सतत मागणी करून ही प्रशासनाचे आणि नगरपालिकेचे आणि वार्ड क्रमांक १४ मधील नगरसेवक हे सतत दुर्लक्ष करत आहेत. लवकरात लवकर नगरपालिकेने मेनरोड व आजू बाजूच्या भागात सॅनिटायझर फवारणी करावी.
– श्री बाळासाहेब बबनराव क्षीरसागर.
मा.नगरसेवक, क. न. प.
करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE