करमाळासोलापूर जिल्हा

वडशिवण्यात फिरायला गेलेल्या शिपायाचा अपघात नसुन खुन ; 24 तासात वेगवान तपास

करमाळा समाचार – 

मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर अज्ञात वाहनाने धडक देऊन मयत झालेल्या विजय काकडे रा. वडशिवणे यांच्या मृत्युच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून त्यांचा अपघात नसून खून असल्याचे समोर आले आहे करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप तळपे, नितीन चव्हाण, सागर शेंडगे यांनी 24 तासात घटना उघडकीस आणली आहे.

रविवारी पहाटे फिरायला गेल्यानंतर एका अज्ञात वाहनाने धडक दिली असा बनाव रचण्यात आला होता. पण पोलिसांनी शिताफीने तपास करत तसेच गोपनीय माहितीच्या आधारे ज्या पिकअप ने धडक दिली. त्या पिकअप मालकापर्यंत पोहोचले. तर रात्रीच्या वेळीही पिकअप चालकाकडे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तपासाचे धागेदोरे वेगात फिरवली.

चालकाची अधिक माहिती तसेच गोपनीय माहितीच्या अधिकारी चौकशी केल्यानंतर चालकावर संशय बळावला. त्यानंतर त्याला पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर स्वतः आरोपीने अपघात घडवल्याचे कबूल केले आहे. त्यावरून आता गुंह्यात वाढ करण्याची काम सुरू आहे. तर याप्रकरणी नेमके कारण शोधणे सुरु आहे. अक्षय ढावरे यास पोलिसांनी संशयीत म्हणुन ताब्यात घेतले आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE