अन्यथा तुमच्या सारखे लाचारांची फौज ही कायम वापरून घेतली जाणार आहे
प्रहार संघटना जरी सत्तेत असली तरी शेतकऱ्यांसाठी अपंगासाठी व मराठा समाजासाठी कधीही लढायला तयार आहे जिथे अन्याय तिथे प्रहार, दत्ता भाऊ मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार सोलापूर
करमाळा समाचार

मराठा समाजातील वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जरा अंतरमूर्ख व्हावे. तुम्हाला समाजापेक्षा पक्ष आणि बापापेक्षा राजकीय नेता मोठा वाटत असेल तर तुमच्या येणाऱ्या दहा पिढ्या बरबाद झाल्या म्हणून समजून घ्या. या देशामध्ये जो तो स्वतःचा स्वार्थ बघतोय आणि या व्यवस्थेत तुम्हाला जर काही पदरात पाडून घ्यायचे असेल तर या राजकीय नेत्यांची चाटुगिरी बंद करून तुम्हाला त्यांना सडेतोड प्रश्न विचारावे लागतील असे आवाहन प्रहारचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर म्हणाले आहेत.

तुमच्या पुढच्या पिढीला भवितव्य आहे अन्यथा तुमच्या सारखे लाचारांची फौज ही कायम वापरून घेतली जाणार आहे. कारण हे नेते तुमच्या जातीचे जरी असले तरी हे तुमच्या मातीचे कधीच नव्हते आणि नाहीत या राजकीय नेत्यांनी त्यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढे त्यांनी कमावलं आहे.
जर आमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी काही करायचं असेल तर पहिल्यांदा आरक्षण मिळालं पाहिजे. कारण आरक्षणाशिवाय आपल्याच समाजाची प्रगती होणार नाही असं मला वाटतं. आहो आमदार-खासदार मराठा समाजाला न्याय देऊ असे आश्वासने देऊन मत घेऊन गेलात ते परत आलाच नाहीत. अहो विसरू नका आमच्या मतावर आमच्या जीवावर निवडून आला तुम्ही आणि मराठा समाज आपल्या न्यायासाठी लढत असताना तुम्ही एकही जण आमच्या बाजूने उभा राहिला नाहीत. अहो सत्तेसाठी एका रात्रीत सूत्र आला होता मग मराठा आरक्षणासाठी का नाही असे मत प्रहार शेतकरी संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.