सूक्ष्म लघु उद्योगासाठी प्रयत्नशील राहणार ; भाजपा उद्योग आघाडीचे नुतन तालुकाध्यक्ष यांचे प्रतिपादन
करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले
करमाळा येथे रोजगार निर्मिती हा आर्थिक विकासाचा मुख्य पाया आहे. आर्थिक विकास हा देशातील सर्वसामान्य जनतेचे आर्थिक जीवन संपन्न करण्यासाठी आवश्यक आहे असे मत भाजपा उद्योग आघाडीचा नुतन तालुकाध्यक्ष बाळासाहेब होसिंग यांनी व्यक्त केले.
ते राष्ट्रीय समाज पार्टी यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, कोरोना काळानंतर ग्रामीण भागात सूक्ष्म लघु उद्वायोगांना चालना मिळाली आहे. उद्योगाकरीता कर्ज पुरवठा, तंत्रज्ञान, पायाभूत सोयी, विक्री व्यवस्था, प्रशिक्षण, संस्थात्मक सुधारणा या बाबी बहुतांश वेळा कागदावरच दिसून येतात.
परंतु याबाबत प्रत्यक्ष जागरूकतेने काम केल्यास ग्रामीण भागातील सूक्ष्म लघु उद्योग उभे राहण्यास मदत होईल. त्यासाठी आपणी प्रयत्नशील राहणार असून गावोगावी छोटे-मोठे उद्योग उभे करू असे अभिवचन होसिंग यांनी दिले.
यावेळी सरपंच धनंजय झिंजाडे, राष्ट्रीय समाज पार्टी चे तालुका अध्यक्ष अंगद देवकते, माजी सरपंच विष्णू रंदवे, ,विलास जाधव श्याम सिंधी नरेंद्र सिंह ठाकुर ,अशोक ढवळे ,सोमनाथ विटकर ,अभिमान सोरटे, विशाल जाधव तसेच पोथरे ग्रामस्थ उपस्थित होते.