करमाळासोलापूर जिल्हा

प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे विविध आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 प्रतिनिधी- केम

श्री उत्तरेश्वर जुनिअर कॉलेज केम येथील प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे यांना राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त विविध राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविन्यात आले.  प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे यांनी श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम या ठिकाणी अनेक शालेय नवोपक्रम राबविले.

डॉ. बापूजी साळुंखे साहित्य संमेलन, शालेय परिसर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण मोहीम, आरोग्य मेळावा, गावातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव कार्यक्रम, वाचन कट्टा उपक्रम इत्यादी नवोपक्रम राबविण्यात आले. डॉ. नागरे यांनी डॉ. बापूजी साळुंखे आणि मराठवाडा, आम्ही पाचजणी, राजन खान आणि समकालीन कथाकार या ग्रंथ लेखना सोबतच अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय चर्चासत्रात भाग घेऊन विविध वर्तमानपत्र, मासिकात लेखन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन साप्ताहिक शिक्षक ध्येय नाशिक, आनंदी गुरुकुल ऍक्टिग अकॅडमी अकोला, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद, अस्तित्व फाऊंडेशन जळगाव या विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थानी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. कोरोना च्या पार्शवभूमीवर हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. सुप्रसिद्ध लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले, राष्ट्रीय कीर्तनकार श्री केशव महाराज, सुप्रसिद्ध तत्वचिंतक श्री श्याम सुंदर महाराज सोन्नर या विशेष पाहुण्याच्या हस्ते प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे यांचा सत्कार करून हे ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळे पार पडले.
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख व सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे यांचे अभिनंदन केले. या पुरस्काराचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE