करमाळासोलापूर जिल्हा

मांगी पुलाजवळ अपघात दोघे ठार ; एक जामखेड तर दुसरा अकलुजचा

करमाळा समाचार 

अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर अकलूजहुन आष्टी कडे जात असताना मांगी येथे झालेल्या अपघातात लक्ष्मण लोखंडे जामखेड) व महेश शिंदे (अकलूज) दोघेही ठार झाले आहे. तर अनोळखी वाहन चालक धडक देऊन पसार झाला आहे.

सदर चा अपघात रविवारी सकाळी झाला आहे. परिसरातील लोकांनी करमाळा पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार, ए एस आय वने आदींनी घटनास्थळाला भेट दिली.

घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE