करमाळासोलापूर जिल्हा

पोलिस असल्याचे भासवत करमाळा शहरातील वृद्धाचे चार तोळे लांबवले ; भामट्याचा शोध सुरु

प्रतिनिधी | करमाळा

चोरीनंतर नागरीकात भिती

शहरातील उघडली येथील ७७ वर्षीय वृद्धास मी पोलिस आहे, करमाळ्यात गणपती बंदोबस्तासाठी आलोय असे म्हणून हातातील दोन अंगठ्या व गळ्यातील चेन हातचलाखीने काढून घेतल्याचा प्रकार शनिवारी सकाळी साडेदहा ते अकरा च्या दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर रंगनाथ दुगम, वय ७७ रा. कुंकू गल्ली तक्रारदार वृद्धाचे नावे आहे. त्यांच्याकडी एक तोळ्याच्या दोन अंगठी व दोन तोळ्याची चैन चोरट्याने फसवणुक करुन लंपास केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की दुर्गम ते कुंकू गल्ली येथे राहतात नेहमीप्रमाणे ते सकाळी मुख्य रस्त्यावर असलेल्या आपल्या मुलाच्या दुकानात फेरफटका मारून दुसऱ्या चौकात चहाच्या दुकानात जाऊन चहा पीत असतात. त्या पद्धतीने ते सकाळी साडे दहाच्या सुमारास आपल्या मुलाच्या दुकानातून बाहेर पडले व चहा पिण्यासाठी जात असताना त्यांच्या घराकडे जाणाऱ्या बोळीत एक अनोळखी इसम थांबला होता.

त्याने दुगम यांना त्याठिकाणी हाक मारुन बोलवले जेणे करुन बोळीत जास्त गर्दीही नसेल व रस्त्यावर असलेल्या दुकानातील सिसिटीव्ही च्या नजरेतही आपण येणार नाही. अशा पद्धतीने त्याने जागा निवडली. त्यावेळी दुगम जेव्हा शेजारी आले तेव्हा त्याने त्यांना मास्क व्यवस्थीत घालायला सांगितला. स्वतःही तोंडावर रुमाल, गॉगल व डोक्यावर टोपी असा पेहराव केला होता. त्याने दुगम यांना आपण पोलिस असल्याचे सांगितले. गणपती बंदोबस्तासाठी आपण सोलापूरहुन आलोय असे सांगितले.

तर तुम्ही वृद्ध असताना गर्दीत सोने घालुन जाणे योग्य नाही. त्यामुळे एका रुमालात अंगठ्या व गळ्यातील चेन टाका असे सांगितले. त्यांनाही नेमके काय घडतेय हे लक्षात आले नाही. दुगम यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व स्वतःकडील दीड हजार रुपये व सोने ठेवले पण थोड्यावेळाने पाहिले असता त्या रुमालात फक्त दीड हजार रुपये होते सोने नव्हतेच. मग फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी सर्व परिसरात जोरदार शोधकार्य सुरु केले आहे.

Pretending to be a policeman, the old man in the city of Karmala carried four weights; The search for the villain begins

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE