करमाळासोलापूर जिल्हा

दत्तामामा भरणे यांच्या कामावर समाधानी राहणे म्हणजे केवळ सगेसोयरे राजकारण

करमाळा समाचार

उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा प्रश्न करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला होता. हे पाणी देण्यात आ. संजयमामा शिंदे यांची मूक संमती असल्याचा दांडोराही विरोधकांनी पेटवला होता. प्रत्यक्षात इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याच्या अध्यादेशाला आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांनी कडाडून विरोध करून राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार अजितदादा पवार तसेच जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन सदर आदेश रद्द करायला शासनास भाग पाडले.

करमाळा तालुक्यातील बॅकवॉटर चे शेतकरी याबाबतीत आमदार शिंदे यांचे कायमची ऋणी आहेत. पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरचे पाच टीएमसी पाणी पळविण्याचे केलेले कारस्थान त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरला झालेला लसींचा कमी पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा , ऑक्सीजनचा तुटवडा आदी कारणावरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे हटाव मोहीम विरोधकांसह पक्षातील कार्यकर्त्यांनी सुरू केलेली असताना करमाळा तालुक्याचे माजी आ. नारायण पाटील यांनी मात्र आपण ना. दत्तामामा भरणे यांच्या कामावर समाधानी आहोत असे वक्तव्य केलेले आहे.

नारायण पाटील यांची ही भूमिका शंकास्पद आहे. त्यांच्या हृदयातील तालुक्याची जनता आता कुठे गेली ? असा सवाल जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड यांनी उपस्थित केला आहे. पाण्याच्या राजकारणाच्या वेळेस आ. संजयमामा शिंदे म्हणाले होते की , पवार कुटुंबियांचे स्थान माझ्या हृदयात आहे. या आ. शिंदे यांच्या विधानावर टीका करताना करमाळा तालुक्यातील जनता माझ्या हृदयात आहे असे विधान माजी आ. पाटील यांनी केले होते.

मग ज्या जनतेचे पाणी पळविण्याचे कटकारस्थान पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी केलेले असतानाही त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात. मग आता तालुक्यातील जनता गेली कुठे ? माजी आ. पाटील यांनी दत्तामामा भरणे यांच्या कामावर समाधानी राहणे म्हणजे केवळ सगेसोयरे यांचे स्थान त्यांच्या हृदयात आहे असा त्याचा अर्थ होतो .भरणे हे केवळ सगेसोयरे आहेत म्हणूनच माजी आ. पाटील त्यांच्या कामावर समाधानी आहेत का? असा प्रश्नही बारकुंड यांनी उपस्थित केला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE