करमाळासोलापूर जिल्हा

जयंत दळवी यांची निवड सर्वानुमते ; अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करु – दळवी

करमाळा समाचार 


महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन एफ या संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी स्नेहालय न्यु इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.

मेस्टा एफ या जिल्हा कार्यकारणीची बैठक कुर्डुवाडी येथील आदर्श पब्लिक स्कूल येथे संपन्न झाली आहे या बैठकीला संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हरीश शिंदे सेक्रेटरी तथा जिल्हा अध्यक्ष गणेश निळ उपस्थित होते या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते दळवी यांना निवडीचे पत्र देण्यात आले होते. तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संतोष वलगे, संपर्क प्रमुख अनंत कळवस, यांचीही निवड करण्यात आली होती.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोगे,अमोल सुरवसे,डॉ ब्रिजेश बारकुंड,रवी सुरवसे , मोहिते सर, मदने सर, गडदे सर ,संभाजी घाडगे, हेमंत बरडे,अनंत कळवस,संतोष वलगे,आदी जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी संस्थापक, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक निवडीही करण्यात आल्या होत्या.

मेस्टा एफ या प्रदेश व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी माझ्या वर मोठी जबाबदारी दिली आहे भविष्यात करमाळा तालुका अथवा जिल्ह्यातील स्कूल बाबत खुप काही अडचणी आहेत या अडचणी सोडविण्यासाठी मी निश्चित सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे – जयंत दळवी नुतन करमाळा तालुका अध्यक्ष मेस्टा एफ,करमाळा

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE