शौर्य स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांचा यशकल्याणी कडून गौरव
करमाळा समाचार
शोर्य स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांचा यशकल्याणी कडून गौरव आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शौर्य स्पोर्ट्स क्लब करमाळा यांच्यावतीने योगासनांची प्रात्यक्षिके व प्राविण्य बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.गणेशभाऊ करे -पाटील उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार, विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सुर ताल विद्यालयाचे प्राचार्य नरारे सर, श्री.आशुतोश घुमरे सर, तहसील कार्यालय करमाळ्याचे श्री.समीर पटेल, उपस्थित होते.

या कार्यक्रमात शौर्य स्पोर्ट्स क्लबच्या मुला-मुलींनी योगाची नेत्रदीपक प्रात्यक्षिके करून दाखवली व प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी यशकल्याणी परिवाराकडून प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यांला सन्मानपत्र आणि रोख पाचशे रूपये पारितोषिक म्हणून देण्यात आले.
वीणा पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले,त्यांना मार्गदर्शन करून पाच हजार रूपयांची मदत जाहीर केली. तसेच समीर पटेल यांनी देखील राष्ट्रीय खेळाडूचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय भाषणात करे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी यशकल्याणी परिवार सदैव तत्पर असेल असे घोषित केले.
श्रावणी बाबर , स्वरा गपाट, वैष्णवी बाबर , आदिती चांदगुडे , हिंदवी पवार , श्रृती फुटाणे , संयुक्ता सोनके , अनुराधा राऊत , सृष्टी चांदगुडे , सानिका शहा, चेतन राऊत, श्रेयस फुटाणे, संस्कृती साळुंखे, ज्ञानेश्वरी साळुंखे, राजलक्ष्मी सुतार, समर्थ पोतदार, साक्षी खुळे, निधी पन्हाळकर , संस्कृती पाटोळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमासाठी नितीन शेळके साहेब,आरजू पठाण मॅडम व सागर शिरसकर सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. यशकल्याणी परिवाराकडून विजय दुर्गुळे,स्वप्नील ढाणे आणि वैश्विक करे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सुत्रसंचालन संतोष पोतदार सर तर प्रास्ताविक राहुल बाबर सरांनी मांडले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगा असोशियशन
सोलापूर,शौर्य स्पोर्ट्स क्लब प्रशिक्षक करमाळा व पालक संघ यांचे बहुमोल सहकार्य लाभले.