करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्याचे पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळेंसह जिल्ह्यातील ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या ; कर्तव्यदक्ष तसेच वादग्रस्त कार्यकाळ गाजवल्याने पाडुळे चर्चेत

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्यासह जिल्ह्यातील एकूण 9 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलीस निरीक्षक पाडुळे हे कर्तव्यदक्ष तसेच वादग्रस्त या दोन्ही भूमिकेत करमाळ्यात परिचित होते. त्यांच्या त्यांच्या जागी जिल्हा वाहतूक शाखा येथून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची नियुक्ती नुकतीच पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते यांनी केली आहे.

जिल्हा अस्थापना मंडळाची बैठक दिनांक 15 मार्च रोजी घेण्यात आली. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक पाडुळे सह नऊ जणांच्या बदल्या करण्यात आले आहेत. त्यामध्ये राजेश गवळी सोलापूर तालुका पोलीस ठाणे, गोपाळ पवार अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, धनंजय आनंदराव जाधव जिल्हा वाहतूक शाखा, सूर्यकांत कोकणे करमाळा पोलीस स्टेशन, विजय जाधव सुरक्षा शाखा, कल्लप्पा पुजारी नियंत्रण कक्ष, श्रीकांत पाडुळे कुर्डूवाडी, पोलीस ठाणे, सुहास जगताप अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे, रवींद्र गणपत डोंगरे मंदिर सुरक्षा पंढरपूर अशा पद्धतीने या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील सर्व पेंडिंग गुन्हे निकाली लावण्यात पाडूळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अनेक अर्ज निकाली लागली होते. त्यानंतर मोठ्या गुंह्याचा तपास ही वेगात होऊन आरोपींना शिक्षा होण्याच्या मदत झाली होती. त्याशिवाय त्यांच्या कार्यकाळात कोरोनावेळी घेतलेली कडक भूमिकेमुळे अतिशय उत्कृष्ट काम करमाळा पोलीस ठाण्याचे झाले होते. त्यावेळी तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या करमाळ्यात कोरोना येण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटला होता. कर्मचाऱ्यांवर पकड व गुन्हेगारावर दहशत अशा पद्धतीचे काम पाडुळे यांचं राहिलेलं होतं.

तर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडळे यांचं तितकासा जमत नसल्याने त्यांच्याविरोधात अनेकदा उपोषणे आंदोलने करण्यात आली. पण त्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्याशिवाय प्रत्येक गुन्ह्याची शहानिशा करूनच गुन्हा दाखल करीत असल्याने अनेकांना ते भावत नसे त्याशिवाय कर्मचाऱ्यांना व्यवस्थित वागणूक देत नसल्याचेही अनेकदा तक्रारी येत होत्या. त्यामुळे कर्तव्यदक्ष सह त्यांचं वादग्रस्त व्यक्तिमत्व ही करमाळा तालुक्यात परिचित राहिलेलं होतं.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE