करमाळासोलापूर जिल्हा

अतुल खुपसे माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला ; दिले मोठे आश्वासन

करमाळा समाचार 

करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर पंजाब नॅशनल बँकेकडून आमदार संजय शिंदे यांच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन कारखान्याने परस्पर घेतलेल्या 22 कोटी 11 लाख रुपयांच्या कर्जा संबंधी विधानसभेत प्रश्न उपस्थित करू असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांना आश्वासन दिले.

अतुल खूपसे पाटील यांनी मुंबईत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नासंबंधी निवेदन दिले. यावेळी खुपसे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून फडणवीस यांनी प्रश्नासंबंधी माहिती घेतली. आणी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचे अभिवचन दिले.

अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुख्यालयासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन झाले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर कर्ज काढण्याचे प्रकरण राज्यभर गाजले. या कर्जप्रकरणात पंजाब नॅशनल बॅंकेचे अधिकारी व विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन आमदार संजय शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. शेतकर्‍यांच्या नावावर कर्ज असल्यामुळे ईतर बॅंका त्यांना कर्ज देत नाहीत.

त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पावले उचलावीत असेही अतुल खुपसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेऊन खुपसे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE