करमाळासोलापूर जिल्हा

मराठा आरक्षणासदर्भात मराठ्यांची लाट करमाळ्यात

करमाळा – संजय साखरे 


चालू २०२१ या वर्षात मराठा समाजाची स्वतंत्र जनगणना करून मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण द्या अन्यथा मराठा समाज यापुढे गप्प बसणार नाही. त्याचा उद्रेक होईल अशी प्रमुख मागणी करत आज करमाळा तालुक्यातील सकल मराठा सेवकांनी आज करमाळा तहसील कार्यालय समोर जोरदार निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन दिले.

केंद्र सरकार मध्ये भाजप चे पूर्ण बहुमत आहे त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.आज बहुतांश मराठा समाज हा बिकट आर्थिक परिस्थिती तुन वाटचाल करत असून त्यांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीसाठी आरक्षणाची गरज आहे.

राज्य सरकारने मराठा समाज मागास असल्याचे सबळ पुरावे गोळा करून सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडावी.व केंद्र सरकार कडे पाठपुरावा करावा व मराठा समाजाला कोणत्याही प्रवर्गातून का होईना आरक्षण मिळवून द्यावे.अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE