करमाळासोलापूर जिल्हा

वटपौर्णिमा निमीत्त गावातील महिलांना प्रत्येकी वटवृक्षाच वाटप

करमाळा समाचार 

सुजित (तात्या) बागल यांनी आज मांगी येथे महिलांसाठी पर्यावर्णपुरक असा आदर्श उपक्रम राबविला. आज वटपौर्णिमा निमीत्त गावातील महिलांना प्रत्येकी वटवृक्षाच वाटप करण्यात आले. यावेळी मांगी येथील प्रेरणा महिला बचत गटाच्या महिलांनी विषेश सहभाग नोंदवला यावेळी मांगी येथील प्रगती विद्यालयाच्या सौ देवकर मॅडम ,व नूतन ग्रामपंचायत सदस्या कुमारी स्नेहल अवचर यांनी महिलांना वटवृक्षाचे महत्व पटवून दिले

सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष म्हणून ओळखले जाते. तसेच त्याचे पानांचे पण आयुर्वेदात खूप महत्व आहे. हा वृक्ष प्रत्येक महिलेने वर्षभर जोपासयचा व 1 वर्षानंतर पुढील वटपौर्णिमेला ज्या महिलांनी व्यवस्थित वटवृक्ष जगवला असेल अशा महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे असे सुजित (तात्या) बागल यांनी जाहीर केले. या आगळ्यवेगळ्या उपक्रम राबविल्याने मांगी गावतील पर्यावरण प्रेमी गायक प्रवीण अवचर यांनी सुजित तात्यांचे विषेश कौतुक केले. कोणतेही सामाजिक उपक्रम राबवताना पर्यावरण पूरक उपक्रम हि राबवले पाहिजेत असे मत त्यांनी वेक्त केले.

यावेळी मांगी येथील बचत गटाचे सौ निर्मला कांबळे , सौ नूतन बागल यांचेसह गावातील महिला उपस्थित होत्या या सर्वांनी वटवृक्ष जागवण्याचा निर्धार केला हा कार्यक्रम कोरोना संकटाचे काटेखोर नियमांचे पालन करून राबविण्यात आला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE