राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचे वाढदिवसानिमित्त कोळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी प्रवीण अवचर
प्रहार संघटनेचे राज्यमंत्री आ. बच्चू भाऊ कडू यांचे वाढदिवसानिमित्त आज कोळगाव येथील नूतन ग्रा. सदस्य मंत्रालयातील स्वीय सहाय्यक अमित जागते यांचे पुढाकारातून व प्रहार रुग्णसेवक तालुका अध्यक्ष विकी मोरे व सहकारी यांनी मिळून गावात रक्तदान शिबिर आयोजित केले.

या वेळी कोरोना चे नियमांचं काठेखोर पालन करत अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने या शिबिराचे आयोजन केले. यामध्ये 35 ,40 लोकांनी रक्तदान केले. कोळगाव चे सुपुत्र अमित जागते व त्यांचे सहकारी हे गावात विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असतात. स्वच्छता अभियान , तंटामुक्ती , वृक्षारोपण , उन्हाळ्यात पक्षांना जीवनदान म्हणून पाणपोई असे विविध उपक्रम राबवून ते गाव रोगमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

त्याचप्रमाणे आज रक्तदान शिबिराला पण गावतुन तरुण वर्गातून चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी कुर्डवाडी ब्लड सेन्टर ची टीम नियुक्त करण्यात आली होती.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पाटील , उमेश चेंडगे, रमेश चेंडगे, करण चेंडगे, अक्षय सुतार , शरद पवार , अप्पा जागते , मयूर शिंदे , गणेश पाटील , सुमित जागते , प्रणित जागते या सर्वांनी उपस्थित राहून रक्तदान पार पाडण्यास विशेष सहभाग नोंदवला.