अल्पवयीन मुलीला शरीर सुखाची मागणी ; दोघांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल
करमाळा समाचार
अल्पवयीन मुलीस शारीरिक लगट करून शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी दोन जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय गुळवे रा.टाकळी ता.करमाळाव हरीदास कोकाटे रा. खातगाव नं.2 ता.करमाळा यांच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिनांक 12/08/2021 रोजी सकाळी 10:00 वा.चे सुमारास मुलगी राहते घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत व घरातील हाँलमध्ये मौजे टाकऴी ता करमाऴा येथे आभ्यास करीत होती. त्यावेळी गुळवे यांनी हात धरुन शरीर सुखाची मागणी केली तर कोकाटे यांनी संबंध ठेव नाहीतर लग्न होऊ देणार नाही व बालमनास लज्जा वाटेल असेल कृत्य केले अशी तक्रार सदरच्या अल्पवयीन मुलीने दिली आहे.