E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यातील व्यवसायीकाच्या लुटीत थेऊर कनेक्शन ; भुरळ घालुने केली होती लाखोंची लुट

करमाळा समाचार – श्रीगोंदा (अहमदनगर)

करमाळा तालुक्यातील कुशन व्यवसायिक दत्तात्रय महादेव शेटे यांची दोन जणांनी फसवणूक केली असून साधूच्या वेशात येऊन तब्बल साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शेटे यांना करमाळा येथे तुमच्या वरील सर्व कर्ज कमी करण्यास आम्ही मदत करू, तुमचे पैसे दाम दुप्पट करू असे आमिष दाखवून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हा प्रकार घडवला आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चार लाखाचा मुद्देमालासह दोन जण ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे करमाळ्याच्या गुंह्यातील आरोपींचे थेऊर कनेकशन दिसत आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळालेल्या माहितीनुसार थेऊर तालुका हवेली येथील गुन्हेगारांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी सूचना देऊन संतोष देवकर (वय ४५) अशोक चव्हाण (वय ४५) दोघेही रा. जाधव वस्ती ठेवून ता. हवेली जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याकडून चार लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये संतोष देवकर यांच्याकडून एक लाख 70 हजार तर अशोक चव्हाण यांच्याकडून दोन लाख पाच हजार रुपये व 25 हजार रुपयांचे मोटरसायकल असे मिळून आले आहे. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरच्या आरोपी लोकांना औषधी वनस्पती रुद्राक्ष विक्री करण्याचा व भिक्षा मागण्याचा बहाणा करून विश्वास संपादन करून जवळीक साधता त्यानंतर विश्वास संपादन झाल्यानंतर लोकांकडून आर्थिक अडचण आणि असणारे कर्जबाजारी असणाऱ्यांची संभाषणातून माहिती काढता त्यांना आम्ही दुप्पट पैसे देतो असे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात व निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी पैसे घेऊन बोलतात. फुलावर पैसे ठेवून, हातावर तांदूळ देतात, डोळे मिटून प्रदक्षिणा घाला सांगतात व हातचलाखीने नजरचुकीने चुकून पैसे काढून घेऊन जातात पैसे दुप्पट होईल या आशेने मान लोक याला बळी पडत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश ढवळे, पोलीस नाईक गोकुळ इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर, प्रकाश राठोड यांनी केली आहे.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गट, पोलीस कॉन्स्टेबल किरण भापकर यांनी आवाहन केले आहे की, पैशाचा पाऊस पाडणे, दुप्पट रक्कम करणे, स्वस्त धान्य सोन्याचे आम्ही दाखवणे, दागिने पॉलिश करून देणे असल्या बतावणी करून दागिने काढणेअसे आमिष दाखवणारे लोक निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे.

Handcuffs to a looting gang by doubling the amount; The Karmalya trader had cheated millions #karjat #karmala #shreegonda #ahamadanagar

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE