E-Paper

थकबाकीमुळे पत्रकारावर आंदोलनाची वेळ ; नावे जाहीर करण्याचा इशारा

समाचार – कर्जत (जि. अहमदनगर)

पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. पत्रकारिता करत असताना अनेकांना विरोध करून पत्रकार समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट बातम्यांची माहीती पत्रकार प्रसिद्धीमाध्यमाच्या माध्यमातून करत असतो. यामध्ये दैनिक, साप्ताहिक व पोर्टल सारख्या माध्यमांचे पत्रकार काम करत असतात. यासाठी त्याला शासनाकडून कसलेही मानधन नसते अनेक पत्रकार समाजाचे अडीअडचणी सोडवण्यासाठी व अन्यायाविरोधात लढण्यासाठी व आवड म्हणून पत्रकारिता करत असतात. पैसे कमवण्याचे साधन म्हणून पत्रकारितेकडे कधीच कोण वळत नाही.

दैनिक, साप्ताहिक चालावे ते टिकावे म्हणून त्यासाठी जाहीऱातींची आवश्यकता असते. त्याप्रमाणे पत्रकार जाहिराती गोळा करून संबंधित व्यक्तीला लोकांसमोर त्याचा व्यवसाय किंवा त्याची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करतो. त्याने दिलेल्या जाहिरातीचा योग्य तो मोबदला त्या पत्रकाराने त्याला दिलेला असतो असे असतानाही अनेक महाभाग पत्रकारांची देणी मात्र देण्याचे विसरतात.

त्यामुळे आज पत्रकार कर्जबाजारी होत चालला आहे. एक असाच प्रकार घडला आहे तो कर्जत तालुक्यातील आशिष बोरा यांच्याबाबतीत. त्यांनी स्वातंत्र्य दिनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून कर्जत चे ग्रामदैवत श्री संत सद्गुरु गोदड महाराज मंदिरासमोर आंदोलन केले. तर लवकरच थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याचे सांगितले आहे. अनेक दिवसांपासून त्यांची देणी राखडल्याने त्यांनी आत्मक्लेष करण्याचा निर्णय घेतला होता.

ads

पत्रकारिता करीत असताना नजरचुकीने एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमात कोणाचे नाव राहिले असतात सर्व पत्रकारांना त्या व्यक्तीच्या आणि कार्यकर्त्यांच्या रोषास सामोरे जावे लागते. मात्र हेच लोक कधी जाहीरात देण्यासाठी पुढे येत नाही आणि जरी जाहिरात दिली गेल्यास त्याची रीतसर रक्कम भरण्यात धन्यता मानत नाहीत. थकबाकीमुळे अनेक पत्रकारांवर दुर्दैवी प्रसंग ओढवले गेले आहेत. मात्र मी चळवळीतील कार्यकर्ता असून त्यासाठी आंदोलन करत आहे. यासाठी सर्व पत्रकारांनी आपल्या हितासाठी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. – आशिष बोरा, पत्रकार कर्जत

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE