पतीसह कुटुंबातील पाच व्यक्तींचा कोरोनाने मृत्यु ; तीन महिण्याच्या बाळाचे छत्र हरपले
करमाळा समाचार
करमाळा येथील तरन्नुम इक्बाल शेख ही टेंभुर्णी येथून प्रसुतीसाठी करमाळा येथे माहेरी आली होती. ती १२/५/२१ प्रसूत झाली. दरम्यान सासरी टेंभुर्णी येथे कोरोनाने ने कुटुंबियांवर घाला घातला. परिवारातील पती इक्बाल सह पाच व्यक्ती मरण पावल्या. आज त्या तीन महिन्याच्या बाळाचे राहतअली चे पितृछत्र कोरोनाने हिसकावून घेतले. तरन्नूमच्या माहेरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.


सरकारी मदतीसाठी हे कुटुंब वणवण फिरत असतांना राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली श्रीवास्तवकडे या कुटुंबानी सहकार्य साठी विनंती केली.
महिला दक्षता समितीचे सर्व पदाधिकारी अंजली श्रीवास्तव ज्योती पांढरे (अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना करमाळा अध्यक्ष), उषा बलदोटा, शगुप्ता शेख, भावना गांधी तसेच अशपाक जमादार (सोलापूर जिल्हा युवा राष्ट्रवादी कॉग्रेस उपाध्यक्ष) विशाल घोलप यांच्या उपस्थितीत मा.कलेक्टर साहेब यांच्या शी या सदर परिस्थितीचे निवेदन दिले.काम होईल असे आश्वासन ही मा.जिल्हाधिकारी यांनी दिले. शेख कुटुंबातील वडील व आजोबा यांना अश्रू आवरता आले नाही.
कोरोना महामारीने होत्याचे नव्हते केलेपण तरन्नुम शेख सारख्या आईने नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे संगोपन कसे करावे? हा प्रश्न तिला भेडसावत आहे. कुटुंबात आपलं म्हणून कोणी उरले नाही. तरी तिला सरकारी मदत ही मिळायला हवी असे मत अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना.(अध्यक्ष सोलापूर जिल्हा) च्या अंजली श्रीवास्तव यांनी मत मांडले.