मनोहर भोसले करमाळा न्यायालयात हजर ; बारामती नंतर करमाळ्यातही पोलिस कोठडी
करमाळा समाचार
महिलेवर अत्याचार प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात असलेले मनोहर भोसले उर्फ मामा यांना आज करमाळा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

BREAKING NEWS – मनोहर भोसले करमाळा न्यायालयात नेण्यात आले. महिलेवर आत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल कामी कारवाई.

उंदरगाव येथील मनोहर भोसले यांच्यावर बारामतीसह करमाळा तालुक्यातही गुन्हा दाखल झाला होता. बारामती येथे जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत तर करमाळा येथे आत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बारामती येथील न्यायालयाने आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर करमाळा पोलिसांनी त्यांना रविवारी ताब्यात घेतले. तर सोमवारी त्यांना करमाळा येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी करमाळा पोलिसांच्यावतीने पोलीस कोठडी मागण्यात आली. त्यावर माननीय न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.