ज्योतिर्लिंग गणेश मंडळातर्फे कुंभेज येथील शिंदे वस्ती शाळेला दहा हजार रुपये देणगी
करमाळा समाचार
ज्योतिर्लिंग गणेश मंडळ कुंभेज यांचेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती कुंभेज तालुका करमाळा यांना स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शाळेतील भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अमोल मुटके सर तसेच मंडळाचे सचिव गणेश शिंदे सर यांनी दहा हजार रुपये देणगी दिली.

याप्रसंगी मंडळाचे महादेव नलवडे ,बालाजी माने दशरथ शिंदे ,महेश शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लोंढे सहशिक्षक लक्ष्मण भंडारे आदी उपस्थित होते. मंडळातर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना मंडळ सदैव आधार देत असते.