करमाळासोलापूर जिल्हा

ज़िल्हा योगासन स्पर्धेत मुली नं-१ ची श्रावणी बाबर प्रथम

करमाळा समाचार 


योग अससोसिएशन सोलापूर यांच्या विद्यमानाने आयोजित ऑनलाईन खुली ज़िल्हास्तरीय योगासन निवड चाचणी १९ व २० सप्टेंबर रोजी झाली. त्या स्पर्धेत कै. साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथ. मुलींची शाळा क्रमांक एक नगरपरिषद मधील इयत्ता चौथीच्या श्रावणी राहुल बाबर या विद्यार्थिनीने योगासनाचे प्रकार करून दाखवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

करमाळा शहरातून सर्व स्तरातून श्रवणीचे अभिनंदन होत आहे. तसेच २५ व २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राजस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. श्रावणीला विशेष मार्गदर्शन म्हूणन शौर्य स्पोर्ट्स क्लब करमाळा चे सागर शिरसकर व वर्गशिक्षक रमेश नामदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष सहकार्य योग असोसिएशन सोलापूर यांचे लाभले.

श्रावणीच्या या यशाबद्दल माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मुख्याधिकारी बालाजी लोंढे, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, नगरसेवक अतुल फंड, नगरसेविका स्वातीताई फंड , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल फंड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. महेश वीर, मुख्याध्यापक दयानंद चौधरी व शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE