video- मनोहर भोसले यांना करमाळा न्यायालयाचा दिलासा ; दहा दिवसानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी – वकीलांची प्रतिक्रिया
करमाळा समाचार
महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेले मनोहर भोसले यांना आज अखेर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील दहा दिवसांपासून ते करमाळा पोलीस ठाण्यात अटकेत आहेत. आजही करमाळा पोलिसांनी सात दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मागणी मागितली होती. परंतु न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने भोसले यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

बारामती येथील कोर्टातून न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर करमाळा पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. परंतु मध्यंतरी भोसले हे आजारी पडल्याने जवळपास चार दिवसांचा तपास पोलिसांना करता न आल्याने पोलिस कोठडी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयात उभे केले. त्यावेळी न्यायालयाने वाढीव चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

त्याच आधारावर पुन्हा एकदा आज वाढीव पोलिस कोठडी मिळावी तपासा पूर्ण राहिला आहे अशी मागणी करणारा पोलिसांच्या वतीने करण्यात आली. परंतु भोसले यांचे वकील राहुल गायकवाड यांनी तपास अधिकारी हे वेळ मारून नेत आहेत असे सांगत तेच तेच कारणे पुढे करत असल्याचे युक्तीवाद केला. यावेळी सर्व बाबींचा विचार करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. घोडके यांनी मनोहर भोसले यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भोसले यांना जामीन मंजूर व्हावा यासाठी पुढील सुनावणी साठी आपण बार्शी येथील सत्र न्यायालयात जाणार असून त्याठिकाणी जामिनासाठी प्रयत्न करणार असल्याचे ऍड गायकवाड यांनी सांगितले.