करमाळासोलापूर जिल्हा

मनोहर भोसले प्रकरणार नवे वळण ; न्यायालयीन कोठडीनंतरही पोलिसांची वेगळी भुमीका

करमाळा समाचार 

महिलेवर अत्याचार प्रकरणातील करमाळा येथे अटकेत असलेले मनोहर भोसले यांना नुकतेच आज करमाळा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पुन्हा एक नविन ट्विस्ट यात निर्माण झाला असून भोसले यांच्या वकिलासह करमाळा पोलिसही बार्शी येथील सत्र न्यायालयात जाणार आहेत. भोसले यांचे वकील जामिनासाठी तर करमाळा येथील पोलीस चौकशीसाठी अतिरिक्त दिवस मिळावेत यासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

*video- मनोहर भोसले यांना करमाळा न्यायालयाचा दिलासा ; दहा दिवसानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी – वकीलांची प्रतिक्रिया*
https://karmalasamachar.com/video-consolation-of-karmala-court-to-manohar-bhosale-departure-in-judicial-custody-after-ten-days-lawyers-reactio/

राज्यभर गाजलेले प्रकरण आता नव्या वळणावर जाऊन पोचले आहे. अनेकदा म्हणले गेले की यात नेते तसेच प्रशासनाकडून भोसले यांना ढिला हात सोडला जाऊ शकतो.प्रशासन त्यांना सवलतीत इतर सहकार्य करू शकते. या गुन्ह्यात काय होणार नाही मनोहर भोसले सहज बाहेर येईल अशी विविध अटकले लावली जात होती. परंतु पोलिस वेगळ्याच मूडमध्ये असल्याचे दिसून येते. नुकतेच दहा दिवसांपासून अटकेत असलेल्या मनोहर भोसले यांना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली दिलासा मिळाला होता.

*करमाळा – न्यायालयात पुन्हा एकदा वकील आणी पोलिसांचा आमनेसामना पण यावेळी भोसलेंना दिलासा – पोलिसांनी मागीतली होती सात दिवसांची वाढीव कोठडी – काय म्हणाले ॲड. गायकवाड.*

त्यानंतर त्यांचे वकील पुढील कार्यवाहीसाठी बार्शी येथील सत्र न्यायालयात जाऊन जामीनाची प्रोसेस राबवणार असल्याची स्वतः भोसले यांचे वकील रोहित गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी हे जाहीर करण्याच्या व न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात च्या तासाभराच्या आतच पोलिसांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपणही बार्शी येथील सत्र न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने आता पुन्हा या प्रकरणात नेमकं काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु पोलीस या प्रकरणात भोसले यांच्या बाबत अजिबात ढिलाई घेताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सूर्यकांत कोकणे हे तपास अधिकारी असून त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनोहर भोसले हे प्रकरण अतिशय नावाजलेले प्रकरण आहे. या प्रकरणात सामाजिक व महिलाविषयक गुन्ह्यांचे नोंद आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आम्ही गंभीर पद्धतीने पाहत असून याचा शोधही योग्य पद्धतीने सुरू होता. माननीय न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडी मध्ये काही दिवस भोसले हे आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यातील काही दिवस आम्हाला तपासासाठी मिळून आले नाहीत .हीच बाब आम्ही न्यायालयास पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु आमची मागणी मान्य न करत भोसले यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आम्ही बार्शी येथील सत्र न्यायालयात रिविजन याचिका दाखल केली आहे.
– सुर्यकांत कोकणे , पोलिस निरिक्षक, करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE