कावळवाडीत गणेश करे पाटलांच्या राजीनाम्यानंतर नव्या निवडी
जिंती – दिलीप दंगाणे
कावळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश करे पाटील यांनी राजिनामा दिल्यानंतर दि ७ रोजी नव्या निवडी जाहीर झाल्या आहेत. यानिवडीत अनिल अंबादास वाघमोडे यांची सरपंच पदी अविरोध निवड झाली आहे. यापूर्वी जनतेतील मतदानातून गणेश करे यांनी साडेतीन वर्ष कावळवाडी या ठिकाणी सरपंच पदी काम पाहिले आहे.


कावळवाडी येथील सदस्यांनी गणेश करे पाटील यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत दि ३ ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्याकडे अविश्वासाचा ठराव दाखल केला होता, त्यानंतर करे पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा देत सर्वांना आश्चर्याचा दिला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण समाधानी असल्याचेही सांगितले होते.
त्यानंतर बुधवारी सकाळी सरपंच पदाच्या निवडी संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी कावळवाडीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सात सदस्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये नुतन सदस्य म्हणून अनिल वाघमोडे यांची निवड झाली. सदर निवडीवेळी यशवंत हाके, अनुसया हाके, पुष्पा कावळे, बबन कावळे, अनिल वाघमोडे, बायडाबाई शेजाळ आदी सदस्य उपस्थित होते. अध्यासी अधिकारी म्हणून शंकर केकान यांनी तर संजय शेटे यांनी सहाय्यक व तलाठी श्री. मोतीकर यांनी काम पाहिले.