करमाळासोलापूर जिल्हा

धरणग्रस्त समितीच्या वतीने पाण्याचे पूजन ; उजनी धरण शंभर टक्के भरले

करमाळा – संजय साखरे 

काल मंगळवारी दुपारी उजनी धरण शंभर टक्के भरले त्यामुळे उजनी धरण ग्रस्त समितीच्या वतीने शेकडो धरणग्रस्तांनी ढोल-ताशांच्या गजरात वांगी नंबर 1 तालुका करमाळा येथे उजनी धरणातील पाण्याचे आज सकाळी विधिवत पूजन केले.
उजनी धरण पुणे, नगर व सोलापूर या जिल्ह्यासाठी वरदायिनी असले तरी या धरणासाठी सर्वात जास्त त्याग सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याने केला आहे.

्यामुळे उजनी धरण 100% भरल्याचा आनंद धरणग्रस्तांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता .या वर्षी उजनी धरण फार उशिराने भरले. दरवर्षी लाखाच्या पुढे येणारा विसर्ग यंदा 35 हजाराच्या पुढे गेलाच नाही, यामुळे उजनी धरण भरेल की नाही याबाबत धरण ग्रस्त शेतकरी चिंतेत होते. परंतु उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील 19 धरणांपैकी 16 धरणे ओव्हरफ्लो झाली आणि अखेर काल शंभरी गाठली. याच आनंदात आज सकाळी ढोल-ताशांच्या गजरात खणा नारळाने उजनी माईची ओटी भरून धरणग्रस्तांनी उजनी धरणातील पाण्याचे विधिवत पूजन केले.

https://karmalasamachar.com/mangesh-chiwtes-work-in-the-medical-field-is-commendable-praises-from-the-minister-of-health/

यावेळी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बंडगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील ,आदिनाथ  कारखान्याचे माजी संचालक भारत साळुंके, वांगी चे सरपंच विठ्ठल शेळके, युवा कार्यकर्ते सचिन देशमुख, तानाजी देशमुख ,लोक विकास डेअरीचे आबा देशमुख, तळेकर, वांगी सोसायटीचे संचालक तुकाराम देशमुख, उपसरपंच ज्ञानेश्वर डावरे, डॉक्टर शेळके, गौतम मोरे, ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख, विकास पाटील, तात्या मामा सरडे, अर्जुन यादव ,बंकट कदम, दत्ता देशमुख ,सुधीर देशमुख, ऋषिकेश देशमुख, सरपंच किरण बोरकर, उपसरपंच दत्ता खरात ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महानवर, जयराम सांगळे, महादेव नलवडे, राजा देशमुख, वामन सरडे, उदय देशमुख, सतीश शिंदे, धीरज देशमुख, गणेश पाटील, चांगदेव देशमुख इत्यादी उपस्थित होते.

*करमाळ्यातील विद्यार्थ्यांनी काढला Health care zone अ‍ॅप ; सोलापूर जिल्ह्य़ातील रुग्णांना मिळेल सर्वप्रकारे दिलासा*
https://karmalasamachar.com/health-care-zone-app-launched-by-karmalya-students-help-to-the-citizens-of-solapur-district/

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE