करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यातील विद्यार्थ्यांनी काढला Health care zone अ‍ॅप ; सोलापूर जिल्ह्य़ातील रुग्णांना मिळेल सर्वप्रकारे दिलासा

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा अधिकारी तथा न्याय दंडाधिकारी सोलापूर मा.शमा पवार व सोलापुर जिल्हा आरोग्य विभागाचे प्रमुख cs मा.प्रदीप ढेले साहेब यांच्या समोर व मा. संजय ( बापु ) घोलप (मनसे तालुकाध्यक्ष करमाळा) यांच्या मार्गदर्शनाखाली Team Health Care Zone संस्थापक कु.सायली मनोज पदमाळे व सदस्य अपेक्षा कापसे , प्रसाद कोकिळ, विश्वजित चिवटे, ओंकार मगरगठ्ठ यांनी हाॅस्पिटल च्या सर्व सुविधा संदर्भात अ‍ॅप चे प्रजेटेंशन त्या मध्ये महत्वाचे म्हणजे ह्या अ‍ॅप संदर्भात कोणत्याही पकारचे पैसे देण्याची गरज नाही. ही विद्यार्थ्यांकडून सेवाभावी म्हणून ह्याचे सेवा मिळणार आहे.

त्यामध्ये App वर विविध आरोग्य विषयक सेवा जसे की दवाखाने, मधील डाॅक्टरांची अपॉइण्टमेण्ट असेल किंवा हाॅस्पिटल मध्ये किती बेड शिल्लक आहेत व तिथे कोणत्या आजावर कोणते डाॅक्टर आहेत त्यांची वेळ कधी आहे व मेडिकल , पॅथोलाॅजिकल लॅब,सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व ब्लड बॅंक मध्ये किती साठा शिल्लक आहेत प्लाझ्मा असेल किंवा कोणत्या ब्लड ग्रुप चे किती ब्लड आहे यांची सर्व माहिती आणी ज्या लहान मुलांची जन्मालाच आई वारली आसेल किवा मातेला जन्मता बाळाला दुधाची गरज भासल्यास मिल्क बॅंक,ची पण माहीती उपलब्ध होईल व रूग्नवाहिका किती लांब आहेत व कोणकोणत्या ठिकाणी आहेत त्यांचे मो.नं पण ह्या अ‍ॅप द्वारे सहज इ. सुविधा एका single click वर कमी वेळात आपल्याला उपलब्ध होतील व आपण घरी बसुन वेळेची बचत करून त्याचा लाभ घेऊ शकतो ह्या अ‍ॅप ची तातडीची सेवा म्हणून खुप मदत होणार आहे सोलापूर जिल्ह्य़ातील प्रत्येक गावातील नागरिकांना मध्यंतरी कोरोना काळात हाॅस्पिटल मधील बॅड , रूग्नवाहिका ,बॅल्ड बॅक व प्लाझ्मा असतील व इतर ऑक्सिजन सुविधा असेल यासाठी खुप धावपळ करावी लागली या मध्ये पेशंट ची पण खुप हेळसांड झाली व पुरेशी हाॅस्पिटल ची माहीती नसल्याने काही पेशंट ला आपला जीव पण गमवावे लागले हे दुर्दैव असो..इथुन पुढील काळात तरी आपण भविष्यातील अरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रयत्न करू या विचारातून या आपल्या करमाळ्यातील विद्यार्थ्यांकडून या अ‍ॅप ची निर्मिती केले जाणार आहे.

राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी शौर्य स्पोर्ट्स क्लब च्या 3 खेळाडूंची निवड त्यातील दोन विद्यार्थी गुरुकुल पब्लिक स्कूलचे

हे अ‍ॅप सध्या ह्या विद्यार्थ्यांकडून ते शिकत असलेले कोल्हापूर जिल्ह्या येथे सुरू आहे संस्थापक कु .सायली पदमाळे हि विद्यार्थ्यांनी तात्यासाहेब कोरे काॅलेज ऑफ फार्मसी, वारणानगर, कोल्हापूर
शिक्षण B pharmacy चे शिक्षण घेत आहे तरी पण कोरोना काळातील गरज ओळखून तीने व तीच्या टिम ने ह्या अ‍ॅप ची निर्मिती करून त्याचा प्रसार व उपयोग संपुर्ण महाराष्ट्र सह भारत देशात झाला पाहीजे असा संस्थापक कु.सायली पदमाळे व त्यांच्या टिम चा माणस आहे ..या संदर्भात ते मा.शमा पवार उपजिल्हा अधिकारी व तथा दंडाधिकारी सोलापूर यांना विद्यार्थ्यांकडून पुर्ण माहिती देऊन त्यांना सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व हाॅस्पिटल च्या निगडीत डाटा मिळवण्यासाठी मदत करावी म्हणून भेट दिली व त्यांना पुर्ण प्रोजेक्ट दाखवला असता मा.उपजिल्हा अधिकाऱ्यांकडून कु.सायली पदमाळे व त्यांचा टिम चे त्यांनी खुप कौतुक केले व सर्व काही मदत करू व हा प्रोजेक्ट काळाची गरज आहे असे गौरवोद्गार काढले व आरोग्य विभाग सोलापूर जिल्हा प्रमुख cs यांची भेट घडवुन आणली व त्यांनाही विद्यार्थ्यांना लागेल ती मदत करावी अशी सुचना केली.

निधन वार्ता – ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष प्रा. नरुटे यांच्या मातोश्रीचे निधन

या वेळी कु. सायली पदमाळे यांचे वडील मनोज पदमाळे व आई अ‍ॅड,सौ.अपर्णा पदमाळे यांनी उप जिल्हाधिकारी यांचे मानले आभार आणि हा प्रोजेक्ट लवकरच पुर्ण करून मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते आपल्या सोलापूर जिल्ह्य़ातील नागरिकांच्या सेवेसाठी Health Care Zone ची निर्मिती केले जाणार आहे. अशी माहीती संस्थापक कु.सायली पदमाळे यांनी दिली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE