करमाळासोलापूर जिल्हा

जंगली जनावरे मिळत नसल्याने बिबट्यासदृश्य प्राण्याचा मोर्चा लोकवस्तीकडे ; रात्री एक वासरु केले फस्त

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात दिवेगव्हाण, खातगाव नंतर आता पश्चिम सोगाव परिसरात एका वासराला बिबट्या सदृश्य प्राण्याने फस्त केले आहे. यामुळे पश्चिम भागात भीतीचे वातावरण आहे. तर ग्रामसुरक्षा समितीच्यावतीने दक्ष राहण्याच्या सूचना प्रत्येक गावात देण्यात येत आहेत. सध्या जंगली जनावरे कमी झाल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे बिबट्याने आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवल्याने नागरीकांच्या जीवाला धोका आहे.

करमाळा तालुक्यातील दिव्हेगव्हाण येथे बुधवारी बिबट्या सदृश प्राण्याने कुत्र्याला तर गुरुवारी खातगाव परिसरात जशी वासराला फस्त केले होते. या दोन्ही ठिकाणात 20 किलोमीटरचे अंतर आहे. या दोन्ही ठिकाणांच्या प्राण्याची ठसे बिबट्याचे असल्याचे वन खात्याने सांगितले आहे. तसेच गुरुवारी टाकळी व शुक्रवारी पोमलवाडी परिसरातही बिबट्या सदृश प्राणी दिसला. मात्र टाकळी परिसरात बिबट्या नव्हे तर तर असा असावा असेही त्यांनी म्हटले आहे.

दिवेगव्हाण येथे कोंडीराम खाटमोडे यांचा पाळीव कुत्रा बिबट्या सदृश या प्राण्याने फस्त केला. त्यानंतर खातगाव परिसरात एका शेतकऱ्याचे वासरु खाल्ले त्यानंतर गुरुवारी वन खात्याने येथील प्राण्यांच्या प्राण्याचे तसे नमुने घेतले असल्याचे ते बिबट्याची असल्याचे सांगितले.

तर टाकळी येथील प्राण्यांचे वर्णन हे वाघासारखे आहे. त्यामुळे या भागात वाघ नाही तो तरस असावा असेही वन खात्याने स्पष्ट केले. तसेच रात्री मौजे सोगाव पश्चिम मधील गोडगे वस्ती नजीक माऊली देवस्थान जवळ लहू परशुराम सरडे या शेतकऱ्याचे वासरू बिबट्या ने खाल्ले आहे.

वनखात्याने परिसरातील ग्रामपंचायतीला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत ग्रामस्थांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE