करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सावधान !!! करमाळ्यात ॲडमीन सह एकावर गुन्हा दाखल

करमाळा समाचार

व्हाट्सअप ग्रुप तयार करून सोडून देणाऱ्या ॲडमिनला धोक्याची घंटा दिसू लागली आहे. ग्रुपमध्ये काय चर्चा होतात यामुळे ॲडमिनने लक्ष न दिल्यास त्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे ग्रुपमध्ये भडकाऊ, जाती धर्मा विरोधातले मेसेज कोण टाकत असल्यास यावर वेळीच पायबंध घालणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधित व्यक्ती सोबत गृप ॲडमिनवर ही गुन्हा दाखल होऊ शकतो. असाच एक प्रकार करमाळा तालुक्यात घडला आहे. त्यामुळे भडकाऊ मेसेज टाकणारे व ग्रुप ॲडमिन यांनी सावध व्हावे.

करमाळा शहरातील एका ग्रुप वर करमाळा पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आल्या आहे. त्या ग्रुपमध्ये एका सदस्याने जाती धर्म विषयावरून मेसेज फॉरवर्ड केला होता. त्या मेसेज बाबत ग्रुप मधीलच कोणत्यातरी सदस्यांनी तक्रार केली असावी यावरून पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे समजत आहे.

या पद्धतीने पोलिसांनी संबंधित मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्यासह ग्रुप ॲडमिनवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोघांनाही अटक केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे फक्त ग्रुप काढून बाजूला होऊ नका आपल्या ग्रुपमध्ये काय चाललंय याकडे लक्ष द्या. सध्या जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे अनेक मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत. तो मेसेज आपल्या ग्रुपमध्ये येतोय का याबाबतही शहानिशा करा व संबंधितांना वेळीच सावध करा अन्यथा तुमच्यावर ही गुन्हा दाखल होऊ शकतो.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE