E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

न्युड विडिओ कॉलींग, फसवणुक आणी आर्थिक लुट ; उपाय आणी बचाव

करमाळा समाचार 

सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री व नंतर अश्लील व्हिडिओ आणि फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असताना याबाबत तक्रारी मात्र होताना दिसत नाही. फक्त पैशांची फसवणूक असती तर लोक ही तक्रार द्यायला पुढे आले असते. पण स्वतःची अश्लिल व्हिडीओ समोर असल्याने तक्रार करण्यासाठी कोणी धजावत नसल्याचा फायदा हे फसवेगिरी करणारी लोक घेत आहेत. त्यामुळे अशा लोकांकडून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

फसवणुकीच्या रोज नवीन नवीन पद्धती पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपासून अशीच नवीन पद्धत सुरू झाली आहे. करमाळ्यासारख्या छोट्या तालुक्यात विविध ठिकाणी अशी फसवणुक पण झाली पण तक्रारच न झाल्याने अद्याप त्याबाबत कसलाही गुन्हा दाखल झालेला दिसून येत नाही. यामुळे या फसवेगिरी करणाऱ्या लोकांचे फावत आहे. सोशल माध्यमातून मैत्री करून अश्लिल व्हिडिओ तयार करून त्याच्यातून पैसे उकळले जात असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.

फसवणुक करण्याची सोपी पद्धत …
सुरुवातीला फेसबुक वर मैत्री केली जाते. नंतर व्हाट्सअप नंबर दिला जातो त्या ठिकाणी बोलण्यासाठी प्रतिसाद दिला जातो. ज्यावेळी समोरील व्यक्ती बोलण्यासाठी तयार होते, त्याला बोलताना आपण दोघेही नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करू अशी ऑफर दिली जाते. या अनोळखी व्यक्तीने दिलेली ऑफर अनेक जण स्वीकारतात व व्हिडिओ कॉल करतात. यावेळी नेमकं समोरील व्यक्ती संधी साधून त्या व्यक्तीचा नग्न अवस्थेत महिलेशी बोलत असलेला व्हिडिओ कॉल स्क्रीन रेकॉर्डिंग च्या माध्यमातून सेव करून ठेवतो व नंतर संबंधित व्यक्तीला माघारी पाठवतो. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना समोर असलेली व्यक्ती ही महिला नसून पुरुषच असते त्याने फक्त नग्न महिलेचा व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलच्या माध्यमातून दाखवलेला असतो. नंतर हे प्रकरण थंड करण्यासाठी समोरील व्यक्तीकडून पैशाची मागणी केली जाते. यामधून बदनामीच्या भीतीने लोक पैसेही देतात. शिवाय तक्रार करत नाही. पण मी यातून बदनामीच्या भीतीने जीवाचे बरे वाईट होऊ शकते अशी पुसटशी कल्पनाही समोरील व्यक्तीला नसल्याने मोठा धोका होऊ शकतो. यामुळे अशा लोकांकडून सावध राहणे गरजेचे आहे.

असा प्रकार घडलाच तर …
यापूर्वी कल्पना नसल्यामुळे असा प्रकार घडला तर सुरुवातीला तर आपले स्वतःचे अकाऊंट ब्लॉक करावे. संबंधित व्यक्तीला ब्लॉक करून आपला व्हाट्सअप क्रमांक ही ब्लॉक करावा. जेणेकरून त्याला आपले फेसबुकचे इतर मित्र दिसणार नाहीत. यामुळे तो आपला चुकीचा व्हिडिओ इतरत्र पसरऊन तुमची बदनामी होणार नाही.

सोशल मेडीयात अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करु नका. आपले अकौंट मध्ये जाऊन लॉक करुन सुरक्षीत ठेवा. सोशल मीडिया मध्ये आपली वैयक्तिक माहिती टाकत असताना काळजी घ्यावी. तसेच अनोळखी व्यक्ती सोबत चॅटिंग किंवा व्हिडिओ कॉल करू नये. जर असे घडले असेल तर घाबरून जाऊ नका जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा.आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल.
सुरज निंबाळकर, उपनिरिक्षक,
सायबर पोलिस , सोलापूर ग्रामीण

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE