करमाळासोलापूर जिल्हा

माझा कार्यकर्ता विकाऊ नसुन स्वाभिमानी आहे – माजी आमदार पाटील

समाचार टीम

माझा कार्यकर्ता विकाऊ नसून स्वाभिमानी आहे, कार्यकर्त्यांच्या बळावरच मी आमदार पदापर्यंत पोहचू शकलो असल्याचे स्पष्टोक्ती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली. पाटील गटाच्या वतीने आज माजी आमदार नारायण पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. जेऊरसह करमाळा तालुक्यात अनेक गावात सामाजिक उपक्रम राबविले गेले.

जेऊर ता करमाळा येथे आनंद ऋषीजी नेत्यालय, अहमदनगर यांच्या वतीने जेऊर सकल जैन संघाने भव्य नेत्रशिबीर आयोजित केले. तसेच भव्य आरोग्य शिबीरही राबविण्यात आले. यात विविध आजारावरील तज्ञ डाॅक्टरांनी मोफत रुग्णसेवा केली. जेऊर ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार नारायण पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ सुभाष सुराणा हे होते. तर यावेळी व्यासपीठावर माजी जि प सदस्य दिलीपदादा तळेकर, आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे,नवनथ झोळ, धूळाभाऊ कोकरे, जि प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती अतूल पाटील,जि प सदस्य बिभीषण आवटे, उपसभापती गणेश चौधरी, दत्ता सरडे, शेखर गाडे, गहिनीनाथ ननवरे, पोपटशेठ मंडलेचा, रामलाल कोठारी,उदयसिंह मोरे-पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेशदादा चिवटे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, मा सरपंच भास्कर कांडेकर, सचीव प्रा अर्जून सरक, प्रा. डाॅ अनंतराव शिंगाडे, प्राचार्य दहिभाते, मुख्याध्यापक व्यवहारे, प्रा डाॅ संजय चौधरी जेऊर ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी करमाळा तालूका माळी संघ, सकल जैन संघ, मराठा सेवा संघ, यंग मुस्लीम जमात, नाभीक संघटना, सराफ असोशिएशन, व्यापारी संघटना, कर्मयोगी पतसंस्था, लोकनेते पतसंस्था, आनंद पतसंस्था तसेच विविध ग्रामपंचायतीचे व सोसायटींचे वतीने नारायण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना पाटील म्हणाले की माझे कार्यकर्ते हेच माझे बळ असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका आम्ही कार्यकर्त्यांच्या बळावरच जिंकणार.

आजपर्यंत जनमत नेहमीच माझ्या बाजूला राहिल्यानेच मी अनेकदा विविध निवडणुकीत धनशक्तींचा पराभव करु शकलो. आदिनाथ सभासदांच्या मालकीचा रहावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असून ही लढाई आम्ही जिंकु असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.या कार्यक्रमास करमाळा मतदार संघातील विविध गावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्ताविक ग्रा प सदस्य विनोद गरड यांनी केले तर आभार माजी सरपंच सुलेमान मुल्ला यांनी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE